महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाच्या कर्णधार पदी गुहागर तालुक्याची सुकन्या रेखा सावंत हिची निवड झाल्याने तिचे वडील रविंद्र सखाराम सावंत यांचा सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली तर्फे गौरव
आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्राच्या महिला कबड्डी स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील काताळे गावची सुकन्या कु. रेखा रविंद्र सावंत (सद्या शिक्षणासाठी पुणे) हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. या तिच्या निवडीबद्दल गुहागर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांकडून तीचे अभिनंदन करण्यात येत असून तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत असून काताळे पंचक्रोशीत जल्लोष साजरा करण्यात येत असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली तर्फे रेखा सावंत हिचे वडील रविंद्र रविंद्र सखाराम सावंत यांचा सत्कार करुन सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी, खोडदे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी, वाघांबे गावचे पत्रकार विनायक भागवत, आबलोलीचे पत्रकार संदेश कदम यांचेहस्ते सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे गौरवण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.