सोशल मीडियावर अफवा आणि आक्षेपार्ह सामग्री प्रसारित न करण्याचे रत्नागिरी पोलीस दलाचे आवाहन.
✍️राजू सागवेकर/राजापूर
▪️ राजापूर तालुक्यात घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा आणि आक्षेपार्ह पोस्ट्स प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेता, रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस दलाच्या वतीने कळविण्यात आले आहे की:
➡ सोशल मीडिया निगराणी: सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरीद्वारे 24×7 सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यात येत आहे.
➡ *कठोर कारवाईचा इशारा:* कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अथवा व्हिडिओ प्रसारित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
➡ *अफवांपासून सावधान:* कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा त्या पुढे पसरवू नका.
➡ *कायदेशीर जबाबदारी:* सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्रांमध्ये कोणत्याही बातम्या प्रसारित करण्यापूर्वी अधिकृत खात्री करणे आवश्यक आहे.
➡ *सहकार्याची अपेक्षा:* रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यास आणि पोलिसांना सहकार्य करण्यास पुढाकार घ्यावा.
▪️ पोलीस दलाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट्स आणि अफवांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.