रायगड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के! बुधवार रात्रीची घटना, नागरिकांमध्ये भीती!!
नवी मुंबई (मंगेश जाधव)
रायगड जिल्ह्याला बुधवारी रात्री भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत.
भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् तेचा केंद्रबिंदु कोणता होता? याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही. रात्री लोक झोपेत असतानाच अचानक रायगड जिल्ह्यात भूकंपाचे हादरले जाणवले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या,काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेण तालुक्यातील तिलोरे, वरवणे आणि सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे हादरले जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. त्यामुळे रायगडमधील बऱ्याच दावात रस्त्यांवर अचानक मोठी गर्दी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रायगडमधील पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे हादरले जाणवले. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांची गावांना भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करून धीर दिला. पेण आणि सुधागडमध्ये जमिनीला हादरे बसून भू गर्भातून आवाज आला, घरातील भांडी हलली, इतर कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पण अचानक आलेल्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही. जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.