मुख्यमंत्र्यांनी घेतला 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा:बैठकीला सचिवांसह 6854 अधिकारी उपस्थित राहत केला विक्रम,15 अधिकाऱ्यांना दिली प्रमाणपत्रे….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांनी घेतला 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा:बैठकीला सचिवांसह 6854 अधिकारी उपस्थित राहत केला विक्रम,15 अधिकाऱ्यांना दिली प्रमाणपत्रे….

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज 100 दिवसां च्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025

या कालावधीत जी कामे झाली आहेत त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एक विक्रम देखील झाला आहे.

या बैठकीला मंत्रालय सचिवां पासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.ऑनलाईन बैठकी ला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रम, तालुका स्तरा पर्यंत अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

अधिकाऱ्यांना सूचना देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करा, त्या इतरांनाही सांगा. गुंतवणूक येत असताना गुड गव्हरनन्स द्या, संकेतस्थळे फुलप्रूफ करा.संपूर्णकालावधीचा आढावा आल्यानंतर 1 मे रोजी याचा सार्वजनिक कार्यक्रम करू असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

महायुती सरकार सत्तेवर आल्या नंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचेआदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना,तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्या चे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, अशा सूचना देखील फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या आहेत

.या 15 अधिकाऱ्यांना देण्यात आली प्रमाणपत्रे

पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटील

सातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेख

संभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रा

मुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकर

गृह, अतिरिक्त मुख्य सचिव: इकबालसिंग चहल

आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: शेखर सिंग

आयुक्त, ठाणे महापालिका: सौरभ राव

मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडे

मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सन

जिल्हाधिकारी, नागपूर: विपीन इटनकर

जिल्हाधिकारी, जळगाव: आयुष प्रसाद

विभागीय आयुक्त, पुणे: डॉ. पुलकुंडवार

आदिवासी आयुक्त: लिना बनसोडे

आयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकर

सचिव, मृद व जलसंधारण: गणेश पाटी

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न