रत्नागिरी शहरातील समस्या सोडवण्यासाठी भाजपाची नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी शहरातील समस्या सोडवण्यासाठी भाजपाची नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा

रत्नागिरी, ५ मार्च: रत्नागिरी शहरातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संवाद झाला.

शिमगोत्सवासाठी शहरातील व्यवस्था सुधारण्याची मागणी

शहरात शिमगोत्सव उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग सुस्थितीत राहावा यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच पथदिवे आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रत्नागिरीचे श्रद्धास्थान देवभैरीच्या भेटीसाठी येणाऱ्या पालख्यांसाठी मार्ग सुटसुटीत व सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला.

साळवी स्टॉप कचरा डेपो समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

साळवी स्टॉप येथील कचरा डेपोवर वारंवार आग लावली जाते, यामुळे स्थानिक नागरिकांना धुराचा त्रास होत आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी भाजपाने केली.

उनाड कुत्र्यांचा त्रास आणि डासप्रादुर्भावावर उपाययोजना

प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार उनाड कुत्र्यांचा त्रास आणि डासप्रादुर्भावावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली. दामले विद्यालय परिसरातही विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

डास प्रतिबंधक फवारणी तत्काळ सुरू करण्याचा निर्णय

शहरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उद्यापासूनच फवारणी सुरू करणार असल्याचे स्वच्छता पर्यवेक्षकांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

बैठकीला भाजपाचे पदाधिकारी उपस्थित

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी नगरसेविका प्रणाली रायकर, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, दादा ढेकणे, निलेश आखाडे, मंदार खंडकर, शैलू बेर्डे, सायली बेर्डे, भक्ती दळी, कुंभार मॅडम, अमित विलणकर, विनय मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

– रत्नागिरी शहरातील समस्यांवर लवकरात लवकर तोडगा निघावा, यासाठी भाजपा पदाधिकारी प्रयत्नशील!

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा राजापूर - संदीप शेमणकर  बदलत्या काळासोबत जुन्या,...
Read More
कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश  वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा यू गुहागर - युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत...
Read More
मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! *रत्नागिरी/ राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वेगवेगळ्या कारवाया...
Read More
लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

 धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय **पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा)...
Read More
धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी   बेणी बुद्रुकच्या कुसुममळेवाडीत मध्यरात्रीची घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,...
Read More
लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द

नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द प्रशांत पोवार *नाटे, ता. राजापूर : पर्यावरणपूरक...
Read More
नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द