महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न – महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस निर्णय

महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न – महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस निर्णय

 

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर, महायुती समन्वय समितीची महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी काल पार पडली.

 

या बैठकीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संदिपान भुमरे, खासदार सुनील तटकरे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील आणि भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या बैठकीत महायुतीतील समन्वय वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय रणनीती तसेच विकासकामांच्या आढाव्याबाबत देखील विचारविनिमय झाला.

 

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुती एकसंघ असल्याचे स्पष्ट करत, आगामी काळात राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें