कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – मंत्री नितेश राणे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – मंत्री नितेश राणे

कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – मंत्री नितेश राणे

हिंदू धर्मावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला जागेवरच उत्तर दिले जाईल” – नितेश राणे

रत्नागिरी: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वर येथे आयोजित हिंदू धर्म रक्षण दिन कार्यक्रमात बोलताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मोठी घोषणा केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार महायुती सरकारने केला असून, संपूर्ण जग या स्मारकासमोर नतमस्तक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हिंदू धर्मावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला जागेवरच उत्तर दिले जाईल. हीच शिकवण संभाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे.” तसेच छत्रपती संभाजीनगरातील “स्वराज्यातील काळा ठिपका” लवकरच हटवला जाईल, असेही ते म्हणाले.

महायुती सरकारचा दृढ निश्चय

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित तसेच मोठ्या संख्येने शिवशंभू प्रेमी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, मी येथे मंत्री किंवा आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून आलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ कसबा येथे भव्य स्मारक उभारले जाईल. यासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.”

ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यांच्या तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पाठिंब्याने या स्मारकासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही सरदेसाई कुटुंबाशी चर्चा करून त्यांना योग्य तो सन्मान देणार आहोत. मात्र, महाराजांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण

मंत्री राणे यांनी मुघल आक्रमण, हिंदू मंदिरांची तोडफोड, माता-भगिनींवरील अत्याचार यांचा उल्लेख करत संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, “आज काही जण संभाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते असे सांगून चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सत्य हेच आहे की, महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यामुळे हिंदू धर्मावर कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये.”

स्वराज्यातील ‘काळा ठिपका’ हटवणार

नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “छत्रपती संभाजीनगरातील ‘स्वराज्यातील काळा ठिपका’ हा लवकरच हटवला जाईल. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याच्या आठवणी जतन करायच्या आहेत, त्यामुळे विरोध कितीही झाला तरी कठोर निर्णय घेतला जाईल.”

हिंदू धर्मरक्षणाचा निर्धार

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “आज फक्त भगव्या टोप्या घालून चालणार नाही, तर हिंदू धर्म रक्षणाची शपथ घ्यावी लागेल. आपल्या राजांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे.”

कार्यक्रमाची सांगता उत्साहात

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर पोवाडा सादर करण्यात आला. चैत्राली सुर्वे या बालिकेने महाराजांच्या गारद सादर केली. कार्यक्रमानंतर मंत्री नितेश राणे आणि उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला