१५ रोजी आबलोली खालील पागडेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
प्रकृती फाऊंडेशन, पंचायत समिती गुहागर, लाइफ केएर यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
आरोग्यदक्ष ग्राम उपक्रमांतर्गत प्रकृती फाउंडेशन पंचायत समिती गुहागर,लाइफ केएर हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने आणि स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे सहकार्याने शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत महिला व पुरुषांची एकदिवसीय मोफत कॅन्सर तपासणी, आरोग्य तपासणी, आणि नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन गुहागर तालुक्यातील आबलोली येथील खालील पागडेवाडी सभागृहात करण्यात आले असून या शिबिरात कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. नेहा टोपो, जनरल फिजिशियन डॉ. स्वरदा कदम यांचेसह तज्ञ डॉक्टरांची टिम उपस्थित राहणार असून या संपूर्ण शिबिराचा आबलोली गावासह आबलोली पंचक्रोशीतील जनतेने मोफत लाभ घ्यावा असे जाहिर आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र
आबलोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा गंगावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे