लेखक,शाहिर शंकर भाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखक,शाहिर शंकर भाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन…

लेखक,शाहिर शंकर भाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन…

नंदकुमार बागडेपाटील 

अ.नगर/प्रतिनीधी:”भारतीय लहुजी सेनेच्या” वतीने अहिल्यानगर,रामवाडी येथे मातंग समाजाचे लेखक,शाहिर स्व.शंकर भाऊ साठे यांच्या स्मृतीदिना निमीत्त अभिवादन करण्यात आले. देशाचे विश्वविख्यात साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे धाकटे बंधु स्व.शंकर भाऊ साठे यांना १५ मार्च स्मृतीदिना निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महिला जिल्हाध्यक्षा मिराताई सरोदे व युवाजिल्हाध्यक्ष सुनिल सकट यांनी त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. शाहिर शंकर भाऊ साठे यांनी १५ कांदबर-या लिहील्या असुन त्यातल्या १२ प्रसिद्ध झाल्या आहेत ते लोकप्रबोधन करुन शाहिरी गात असत. ते जिवणाच्या रणांगणावर लढणारे लेखक होते. त्यांच्या अभिवादन समयी मानवी हक्क अभियानचे शहराध्यक्ष अशोक भोसले,दत्ता जाधव महिला भगिनी, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...