पंचायत समिती गुहागर आयोजित ब्लेंडेड कोर्स उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना…. श्री दिलीप माणगावकर

गुहागर ( सुजित सुर्वे) शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर आयोजित तालुकास्तरीय मराठी गणित विज्ञान इंग्लिश ब्लेंडेड कोर्स अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले.सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून गुहागर तालुका शिक्षण विभागाचे पी एल सी नियोजन करण्यात आले .सदर प्रशिक्षणातून पीएलसी च्या माध्यमातून आपले शैक्षणिक विचार इतर, सहअध्यायी प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे शैक्षणिक विचारांचे अदान प्रदान झाले .शैक्षणिक विषयांवर पीएलसी बाबत चर्चा विमर्श करण्यात आली.पाठ्य घटक पी एल सी च्या माध्यमातून कसा मनोरंजनात्मक व सोपा करता येईल यावर मार्गदर्शन झाले. तज्ञ मार्गदर्शक श्री दिलीप माणगावकर म्हणाले की या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचा व्यवसायिक विकास होणार आहे शिक्षकांचा व्यावसायिक विकास होण्यासाठी प्रतिवर्षी 50 तासांचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रत्येक विषयाचे प्रत्येक शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये देण्यात येणार आहे .त्यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जामसुत हायस्कूलचे दिलीप माणगावकर, शीर हायस्कूलचे जी एल पाटील सर ,श्री प्रताप देसले सर ,अश्विनी मोहिते मॅडम, पालपेणे हायस्कूलचे मोहिते सर ,ढवळ सर ,यांनी काम पाहिले.इंग्रजी प्रशिक्षणार्थ्यांमधून किन्हाळे सर, पवार मॅडम तर विज्ञान प्रशिक्षणार्थ्यांना गोरिविले सर ,सोनवलकर सर यांनी उत्स्फूर्त सादरीकरण केले .मनोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .तर आभार प्रदर्शन विषय शिक्षिका अश्विनी मोहिते मॅडम यांनी केले