कोकण कट्टा आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत पाटपन्हाळे , अंजनवेल , पालपेणे व तळवली हायस्कूलचे सुयश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोकण कट्टा आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत पाटपन्हाळे , अंजनवेल , पालपेणे व तळवली हायस्कूलचे सुयश

( मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शैक्षणिक उपक्रम संपन्न )

आबलोली (संदेश कदम) 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोकण कट्टा आयोजित गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे , दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल , वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटामध्ये नुकतीच संपन्न झाली होती. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सदरच्या विद्यालयांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून सुयश संपादन केले आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे गत वर्षाप्रमाणे यंदाही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे , दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल , वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयांमध्ये नुकतीच संपन्न होऊन सदर स्पर्धेमध्ये या विद्यालयांतील सुमारे ७०० ( सातशे ) विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात इयत्ता पाचवी व सहावी या गट क्रमांक – ०१मध्ये कु. मधुरा प्रमोद शेलार – ६वी – प्रथम क्रमांक , अथर्व अनिल घाणेकर – ६ वी – द्वितीय क्रमांक व शौर्य सुजित जोशी – ५वी – तृतीय क्रमांक तसेच इयत्ता सातवी ते नववी – गट क्रमांक – २मध्ये कु.समृद्धी सुरेश आंबेकर – नववी – प्रथम क्रमांक , कु.श्रीया संतोष नागेश – नववी – द्वितीय क्रमांक व श्रद्धा अनिल धुमक – नववी – तृतीय क्रमांक संपादन केला. दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल विद्यालयात इयत्ता सातवी ते नववी गटामध्ये कु.सोनाक्षी सचिन घाणेकर – आठवी – प्रथम क्रमांक , कु.वैदही श्रीकांत पेडणेकर – आठवी – द्वितीय क्रमांक व श्रावणी अनिल घडशी – नववी – तृतीय क्रमांकाचे सुयश पटकावले . वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे विद्यालयात कु.आर्या विजय गुढेकर व अनुष्का नरेंद्र म्हस्कर – प्रथम क्रमांक , कु.शमिका मुकुंद नाचरे व निसर्गा अनिल म्हस्कर – द्वितीय क्रमांक तसेच विनया संतोष पवार व धनश्री रामचंद्र रहाटे – तृतीय क्रमांक पटकावला . न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली विद्यालयात इयत्ता पाचवी ते सहावी गटामध्ये कु.मंथन योगेश साळवी – सहावी – प्रथम क्रमांक , समर्थ किशोर चिवेलकर – सहावी – द्वितीय क्रमांक व स्वरा प्रविण साळवी – पाचवी – तृतीय क्रमांक तसेच इयत्ता सातवी ते नववी गटामध्ये कु.सायली दत्ताराम पिंपळकर – नववी – प्रथम क्रमांक , आयुषी सुभाष डाकवे – नववी – द्वितीय क्रमांक व दिक्षा महेंद्र पडवळ – नववी – तृतीय क्रमांक संपादन केला.सदरच्या विद्यालयांमधील सुयशस्वी विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे आकर्षक चषक , प्रमाणपत्र , पुस्तक , भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयांमधील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे , अध्यक्ष नितीन कुलकर्णी , सचिव सुनिल वनकुंद्रे , कोषाध्यक्ष सुजित कदम व पदाधिकारी यांचे पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.डी.गोरीवले , पालपेणे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.व्ही.हासबे व तळवली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.ए.थरकार व विद्यालयांतील शिक्षकवृंद यांनी स्पर्धा आयोजित करून शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल आयोजक कोकण कट्टा यांचे धन्यवाद मानले. सदरच्या स्पर्धेसाठी पाटपन्हाळे विद्यालयाचे शिक्षक एस.वाय.भिडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल पाटपन्हाळे विद्यालयातर्फे पर्यवेक्षक जी.डी.नेरले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हस्ताक्षर स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व पालक यांनी अभिनंदन केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव