लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांची भेट.
गुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने केले जंगी स्वागत

आबलोली (संदेश कदम)
गुहागर विधानसभा मतदार संघातील बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी रत्नागिरी येथे लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका पटेल मॅडम यांची सदिच्छा भेट घेतली बळीराज सेनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कार्यालयात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे गुहागर विधानसभा मतदार संघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. ऐश्वर्या कातकर गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड तालुका सचिव ॲडवोकेट दिनेश कदम उपस्थितीत होते
यावेळी ओबीसी बांधवाना मिळणाऱ्या शासनाच्या विविध कर्ज योजना बाबत पटेल यांनी सखोल माहिती दिली व योजना ना नागरिकांनी दाद देऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले
दरम्यान कोकणातील नागरिकांनी व्यवसायात सहभाग घ्यावा व आर्थिक लाभ घ्यावा असे म्हटले आहे
यावेळी बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांचे त्यांनी आभार मांडले