गुहागर: भंडारी भवनसमोरील पेव्हिंग ब्लॉक प्रकरणात खोटी तक्रार उघड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर: भंडारी भवनसमोरील पेव्हिंग ब्लॉक प्रकरणात खोटी तक्रार उघड.

भंडारी भवन

गुहागर (सुजित सुर्वे प्रतिनिधी) – गुहागर शहरातील भंडारी भवनसमोरील मैदानावर नगरोत्थान निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप करत आमदार भास्कर जाधव यांनी चौकशीची मागणी केली आहे. मात्र, या वादात नवा ट्विस्ट आला असून, या प्रकरणात दाखल करण्यात आलेली तक्रारच बनावट असल्याचे समोर आले आहे.

गुहागर नगरपंचायतीने भंडारी समाज संस्थेकडून संमती घेतल्यानंतर मैदानावर पेव्हिंग ब्लॉक बसवले होते. मात्र, या कामावर आक्षेप घेत कल्पेश गुरव यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले गेले. या पत्रात, सदर जागा सार्वजनिक असून, भंडारी समाजाने अनधिकृतपणे ताबा घेतल्याचा आरोप होता. तसेच, गेट आणि कंपाउंड उभारून नागरिकांना प्रवेश नाकारला जात असल्याने ही जागा खुली करण्याची मागणी करण्यात आली होती.

या तक्रारीच्या आधारे आमदार भास्कर जाधव यांनी ३ मार्च २०२५ रोजी नगरविकास सचिव, कोकण विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, सरकारी निधीचा गैरवापर झाल्यास तो जबाबदारांकडून वसूल करावा, असेही नमूद करण्यात आले.

मात्र, या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भंडारी समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार कल्पेश गुरव यांचा शोध घेतला असता, ते गुहागरजवळील असगोली येथे आढळले. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी अशी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर अर्जावरील सही आणि पत्ताही आपला नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर, कल्पेश गुरव यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करून आपली तक्रार बनावट असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने ही तक्रार केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेमुळे गुहागर नगरपंचायत आणि भंडारी समाज संस्थेत खळबळ उडाली आहे. आता प्रश्न असा आहे की, ही बनावट तक्रार कोणी आणि का केली? तसेच, यामागे कोणते राजकीय किंवा अन्य हितसंबंध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच मिळतील. दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांच्या पत्रानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला