मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच,खेरशेत वतीने ‘ देवानं प्रिय असोक ‘ या नाट्य कलाकृतीचा सन्मान 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच,खेरशेत वतीने ‘ देवानं प्रिय असोक ‘ या नाट्य कलाकृतीचा सन्मान 

नवी मुंबई (मंगेश जाधव)

चक्रवर्ती सम्राट अशोकाचा युद्धापासून बुद्धाकडे घेऊन जाणारा अविस्मरणीय दोन अंकी नाट्य प्रयोग बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मिती आणि सिद्ध आर्ट प्रणित ‘ देवानंप्रिय असोक ‘ नुकताच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे संपन्न झाला. याप्रसंगी समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बुदीपाचा गौरवशाली इतिहास इथल्या अपरान्त भूमीत नाट्यकला कृतीतून सादर केलेल्या सर्व कलावंतांचा मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच , खेरशेत,ता.चिपळूण ,जि. रत्नागिरी या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने मंचाचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या समवेत आद. मनोज जाधव सर, प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांच्या शुभहस्ते तर सामाजिक कार्यकर्ते आद. सुरेश जाधव , शिवश्री कृष्णाजी कोकमकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मित सिद्ध आर्ट प्रणित ‘देवानं प्रिय असोक ‘ यांचा सकल भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बुदीपाचा गौरवशाली इतिहास या महा नाट्यकला कृतीच्या रूपानं चिपळूण नगरीत सादर करण्यात आला. ही महा नाटयकला कृती म्हणजे प्रत्येक भारतीयांनी आवर्जून पहावे अशी सम्राट अशोकाची गौरवगाथा, त्यांच्या संमग्र जीवनातील धगधगता इतिहास ‘ अक्षरशः अपरान्तच्या नाट्य रसिकांना मनस्वी भावला आहे. पसंतीत उतरला आहे. नाट्यातील विविध प्रसंग पहाता मन गहिवरून येते.मनात विचारांचे काहूर निर्माण होते. क्षणा क्षणाला हृदयाची धडधड आणि कळत नकळत डोळ्यातून ओंघळणारे अश्रू यातील प्रत्येक प्रसंगांना दाद देत होते.’ यातील कलिंग युद्धानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या सम्यक विचारांशी समरस होऊन आपल्या दोन्ही मुलांना धम्माच्या प्रचाराकरिता परदेशात पाठवून धम्मक्रांती घडवून आणतो .शिलालेख ,स्थापत्य कला, विद्यापीठांची नवनिर्मिती करून अखंड जम्बुदीपामध्ये एक नवीन परिवर्तन घडवून आणतो. कुशाग्र बुद्धीचा, कर्तव्यदक्ष महापराक्रमी सम्राटाच्या जीवनावर बेतलेला या नाट्यप्रयोगाने चार चांद लावले आहे. खरंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाला समजावून घेण्याकरिता ही अजरामर नाट्य कलाकृती निश्चितच पाहण्याजोगती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावचे सुपुत्र प्रतिभावंत लेखक आद. उदय गणपत जाधव यांच्या सिद्ध हस्ते लेखणीतून साकारलेली ही नाट्य कृती आणि राजापूरची सुकन्या सहनिर्माती पुनम मांजलकर यांच्या कल्पक संकल्पनेतून निर्माण झालेले ‘ देवानप्रिय असोक ‘ ही महा नाट्यकला कृती म्हणजे इतिहासातील एक अनमोल ठेवा म्हणावा लागेल. या महा नाट्यकला कृतीतील सर्वच कलावंतांनी आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अगदी प्राण ओतून आपल्या भूमिकेशी प्रत्येक कलावंत समरस झाल्याचे चित्र स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर , संगीत, पार्श्वगायन , नृत्य दिग्दर्शन , प्रकाश योजना, रंगभूषा आणि दिमाखदार नेपथ्य या अविष्काराने अपरान्त वासियांना मंत्रमुग्ध केले. प्रामुख्याने यातील बहुतांशी कलावंत कोकणातील असल्यामुळे या महा नाट्यकला कृतीला त्यांनी योग्य तो न्याय दिला आहे . विशेषत: सम्राट अशोकाची भूमिका साकारणारे राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावचे सुपुत्र प्रितेश मांजलकर हा कलावंत उपस्थित नाट्य रसिकांचा मनात घर करून राहिला . या नाट्यप्रयोगाच्या समाप्तीनंतर मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच ,खेरशेत ता.चिपळूण ,जि . रत्नागिरी या कौटुंबिक संस्थेच्या वतीने मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या समवेत डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी- भारत ( रजि) या राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष मनोज जाधव सर आणि समता सैनिक दल, चिपळूणचे भीम मार्शल प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांच्या शुभहस्ते आणि बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, चिपळूण या युनियनचे उपाध्यक्ष सुरेश जाधव , सत्यशोधक संघटनेचे शिवश्री कृष्णाजी कोकमकर ,कु. संघराज कदम, कु. संघमित्रा कदम ,सौ. राजमुद्रा कदम यांच्या उपस्थितीत नाटकातील सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला. शाल , पुष्प करंडक स्वरूपात सहनिर्मिती पुनम मांजलकर आणि सम्राट अशोकाची दमदार भूमिका निभवणारे जेष्ठ कलाकार प्रितेश मांजलकर यांनी हा सन्मान स्वीकारला.

सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा ते चिपळूण येथील महेंद्रगिरी (परशुराम क्षेत्र) या अपरान्त भूमीत ‘ देवानापिय असोक हि महा नाट्यकला कृतीच्या माध्यमाद्वारे आम्ही कृतार्थ झालो. उद्याच्या पिढीला सम्राट अशोक कळवा याकरिता मोठा प्रचार आणि प्रसार म्हणजे ‘ देवान पिय असोक ‘ ही एकमेव नाट्यकला कृती निश्चितच प्रेरणादायी ठरेल यामध्ये संदेह नाही असे प्रतिपादन मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेतचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी केले. या अपरान्त भूमीत या महानाट्याचे प्रयोग पुन्हा व्हावेत अशी समस्त चिपळूणकरांनी विनंती करून या बोधीवृक्ष फाउंडेशन आणि सिद्ध ‌आर्ट प्रणित या नाट्यसंस्थेला आणि सर्व कलावंतांना मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचाच्या परिवाराच्यावतीने आणि उपस्थित चिपळूणच्या सर्व हौशी रसिक प्रेक्षकांच्या तसेच बौद्ध धम्म बंधू भगिनींच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्या.

याप्रसंगी पुनश्च चिपळूणकरांच्या आग्रहास्तव ‘ देवानंपिय असोक ‘ या महानाट्याचा प्रयोग एप्रिल महिन्यामध्ये चिपळूण येथे आयोजित करण्याचा मानस बोधीवृक्ष फाउंडेशन च्या वतीने सन्मा. प्रितेश मांजलकर याने व्यक्त केला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound