जैतापूर दशक्रोशीतील मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर,राजापूर डोंगर मार्गे जैतापूर नाटे पावस रत्नागिरी बोरीवली बस सेवा सुरू.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

▶️  जैतापूर दशक्रोशीतील मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर

banner

 

⭕  राजापूर डोंगर मार्गे जैतापूर नाटे पावस रत्नागिरी बोरीवली बस सेवा सुरू

 

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️जैतापूर दशक्रोशीतील ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार* राजापूर आगार व्यवस्थापक *श्री अजित गोसराडेसाहेब* यांनी राजापूरहून

दुपारी 15.30 वाजता डोंगर मार्गे जैतापूरहून सायंकाळी

16.30 वाजता नाटे, आडिवरे,पावस, रत्नागिरी, रामवाडी, पनवेल,सायन, बोरिवली अशी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली असून सदर गाडी *बोरिवलीहून सायंकाळी 19.00 वाजता* सुटून सायन, पनवेल, रामवाडी, चिपळूण, रत्नागिरी,पावस,धारतळे,नाटे, जैतापूर, डोंगर मार्गे राजापूर अशी सुरू करण्यात आली आहे.

▪️ या मार्गावरील मुंबईकर प्रवाशांनी विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन *राजापूर आगार व्यवस्थापक श्री गोसराडेसाहेब* व

एसटी प्रेमी *जैतापूर ग्रामपंचायत सदस्य श्री दिवाकर आडविरकर* यांनी केले आहे.

▪️ प्रवाशांनी या सुविधेला उत्तम प्रतिसाद दिल्यास सदर गाडी *या मार्गावर कायम स्वरुपी चालविण्यात येईल* असे आश्वासन मा.आगार व्यवस्थापक

श्री गोसराडेसाहेब यांनी दिले.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...