राजापूर तालुक्यात अर्जुना नदीवर गोवळ-विलये पूलासाठी २५ कोटींची मंजुरी
राजापूर, रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर गोवळ आणि विलये गावांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निधी मंजुरीबद्दल आमदार किरण सामंत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
या भागातील रहिवाशांची अनेक वर्षांपासून पूल बांधण्याची मागणी होती. स्वातंत्र्यानंतरही अर्जुना नदीवर पूल नसल्यामुळे गोवळ आणि विलये गावातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात हा मार्ग पूर्णतः बंद होत असल्याने स्थानिकांना अन्य मार्गांचा अवलंब करावा लागतअसे