आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून खंडाळा-वाटद शाळेला संगणक
,???? ५८ शाळांना डिजिटल साहित्य; शाळा, पालक व ग्रामस्थांकडून आमदार डावखरे आणि नीलिमा डावखरे यांचे आभार
रत्नागिरी –
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि भाजप नेते निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, खंडाळा-वाटद यांना संगणक प्रदान करण्यात आला. यामुळे शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या शाळेच्या वतीने वर्षा राजे निंबाळकर यांनी संगणकासाठी निवेदन दिले होते. ते मंजूर झाल्यानंतर त्यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि आमदार निरंजन डावखरे व त्यांच्या सौ. नीलिमा डावखरे यांचे आभार मानले.
मुख्याध्यापिका स्वाती बेंद्रे यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या वतीने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
वर्षा राजे निंबाळकर म्हणाल्या, “ह्या समाजाचे आपण सर्व जण देणे लागतो. उद्याची विकसित पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचे साहाय्य हे नेहमीच मोलाचे ठरते.”
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ५८ शाळांना आमदार डावखरे यांच्या निधीतून डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
—