तालुकास्तरीय ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेत समृद्धी योगेश गोवळकर हिने पटकावला द्वितीय क्रमांक
समृद्धीला काव्यवाचनात यश
तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत आबलोलीच्या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक
आबलोली | प्रतिनिधी – संदेश कदम
गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी कु. समृद्धी योगेश गोवळकर हिने प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
गुहागर तालुक्यातील विविध शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. समृद्धीच्या यशामध्ये विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक श्री. प्रसन्न वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्राचार्य श्री. डी.डी. गिरी यांची प्रेरणा तिच्या पाठीशी ठरली.
या गौरवप्राप्त यशाबद्दल लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत तसेच संपूर्ण संस्था कार्यकारिणीने कु. समृद्धीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.