भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त कोतळूक येथील कबड्डी स्पर्धेत तृप्तीनगर अडूर विजेता तर श्रीराम दत्त सेवा आरे संघ उपविजेता.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त कोतळूक येथील कबड्डी स्पर्धेत तृप्तीनगर अडूर विजेता तर श्रीराम दत्त सेवा आरे संघ उपविजेता.

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी यांच्या वतीने आयोजन केलेल्या भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र, तरूण तडफदार आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्री निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता श्री. झोलाई व श्री. वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमन झाले याचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित कोतळूक ग्रामदेवता सहाणेसमोर गुहागर तालुकास्तरीय मातीवरील साखळी पद्धतीच्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या तृप्तीनगर अडूर संघास रोख रक्कम १० हजार व चषक म्हणून गदा, उपविजेता श्रीराम दत्त सेवा आरे संघास रोख रक्कम ५ हजार व चषक म्हणून गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तृतीय क्रमांक साई श्रद्धा बाग तर चतुर्थ क्रमांक सेव्हन स्टार गुहागर यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ ग्रामस्थ बापू महाडीक, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस दिनेश बागकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अडूर संघाचा प्रणय हळये याला टॉवर फॅन, उत्कृष्ट पकड अमर नाटुस्कर, चढाई आरे संघाचा अविनाश शेटे यांना सन्मानित करण्यात आले तर अंतिम सामना सामनावीर प्रसन्न नार्वेकर याला पाण्याचा जार देण्यात आला. भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सुवासिनींनी औक्षण करून केक कापून व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या दोन दिवसांमध्ये कोतळूक सरपंच सौ. प्रगती मोहिते, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, स्पर्धेला बहुमोल सहकार्य करणारे कार्तिक कळझुणकर, झी २४ तासचे प्रणव पोळेकर, केतन पवार, जिल्हा उपाध्यक्ष, श्री दुर्गा देवी देवस्थान ट्रस्ट गुहागर अध्यक्ष किरण खरे, श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड अध्यक्ष शार्दुल भावे, कार्यवाह अमरदिप परचुरे, भाजपा गुहागर विधानसभा संयोजक सतीश मोरे, देवखेरकी उपसरपंच गणेश हळदे, महेश तटकरे, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिनेश बागकर, आशिष विचारे, साईनाथ कळझुणकर, महिला आघाडीच्या अपूर्वा बारगोडे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, दिलिप बागकर, संतोष सांगळे, मंदार पालशेतकर, नाना पालकर, महेश तोडणकर, नितीन कनगुटकर, सुनिल भेकरे, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, देवस्थान कमिटीचे सचिव सिताराम कावणकर, आबा आरेकर, पोलिस पाटील संचिता मोहिते, विनोद शिगवण, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उदमेवाडी अध्यक्ष समीर ओक, उपाध्यक्ष नरेश बागकर आदींसह बहुसंख्येने मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.स्पर्धा निरीक्षक पराग भोसले, पंच प्रमुख समीद घाणेकर यांनी काम पाहिले तर समालोचन दिपक देवकर, साई दाभोळकर, सुयोग आरेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजा हिंदुस्थानी मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला