समाज एकता मनसे चषक २०२५” ला उत्साहात सुरुवात – ब्लू पँथरचा उद्घाटन सामन्यात विजय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाज एकता मनसे चषक २०२५” ला उत्साहात सुरुवात – ब्लू पँथरचा उद्घाटन सामन्यात विजय

प्रमोद गांधी यांच्या संकल्पनेतून १२ समाजांचे एकत्रित प्रतिनिधीत्व; ब्लू पँथरने विराट विश्वकर्मा संघावर मात करत स्पर्धेची दमदार सुरुवात

समाज एकता मनसे चषक २०२५” ला उत्साहात सुरुवात – ब्लू पँथरचा उद्घाटन सामन्यात विजय

आबलोली (संदेश कदम) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून “एक समाज एक संघ, समाज एकता मनसे चषक २०२५” या बहुप्रतिक्षित मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा गुहागर विधानसभा क्षेत्रात उत्साहात सुरु झाली. शृंगारतळी जानवळे फाटा येथील गोल्डन पार्क मैदानावर रंगतदार वातावरणात या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमोद गांधी, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, डॉ. राजेंद्र पवार आणि सर्व समाजांचे अध्यक्ष उपस्थित होते.

उद्घाटन समारंभासाठी पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे, डॉ. राजेंद्र पवार, मामा शिर्के, ओंकार संसारे, गौरव वेल्हाळ, पिंट्या संसारे, महेंद्र मोहिते, संतोष धामणस्कर, मारुती मोहिते, सुरेश जाधव, भीमसेन सावंत, मुकेश असगोलकर, सुमित नांदलस्कर, कैलास पिळणकर, सुदेश सकपाळ, समीर जोयशी, सुरेंद्र निकम, अंतिम संसारे, जितेंद्र साळवी आणि अमित खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेमध्ये खारवी (सागरी योद्धा), भंडारी (टायगर योद्धा), सुतार (विराट विश्वकर्मा), गुरव (जीपीएल यंग स्टार), मुस्लिम (आझाद रॉयल फायटर्स), वैश्य वाणी (कोकण कट्टा), नंदीवाले (श्री तिरुपती बालाजी), तेली (जय संताजी), बौद्ध (ब्लू पँथर), बेलदार (ओम साई इलेव्हन), कुणबी (भूमिपुत्र फायटर्स) आणि मराठा (स्वराज्य रक्षक) समाजांचे एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.

उद्घाटन सामन्यात बौद्ध समाजाचा ब्लू पँथर आणि सुतार समाजाचा विराट विश्वकर्मा संघ आमने-सामने आले. उत्कंठावर्धक लढतीत ब्लू पँथर संघाने विजय मिळवत स्पर्धेची पहिली माळ गाठली.

या वेळी प्रमोद गांधी यांनी मनोगत व्यक्त करताना, “गुहागर तालुक्यातील खेळाडूंनी राज्य व देशपातळीवर आपली छाप सोडावी, यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून संधी निर्माण केली आहे. माझ्याकडून शक्य ते सर्व सहकार्य खेळाडूंना दिले जाईल,” असे सांगितले.

प्रत्येक सहभागी खेळाडूचा मनसेच्या वतीने भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे सूत्रसंचालन शाहिर शाहिद खेरटकर यांनी केले तर समालोचनाची जबाबदारी सिद्धेश ऊतेकर, सिद्दिक मेमन आणि असीम साल्हे यांनी लीलया सांभाळली.

हॅशटॅग्स:
#मनसेचषक2025 #समाजएकता #गुहागरस्पर्धा #ब्लूपँथरविजयी #प्रमोदगांधी #गुहागरमनसे #CricketWithUnity #RatnagiriNews

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी