🐟 मच्छीमारांसाठी मोठा दिलासा! राज्य सहकारी बँकेकडून १००० कोटींची तरतूद
मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांच्याही जीवनमानात सुधारणा होण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्यविकास विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर आता राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी तब्बल १००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. मुंबईतील राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
या बैठकीला मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, पदुमचे सचिव डॉ. रामास्वामी एन, मत्स्य आयुक्त किशोर तावडे, राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
मच्छीमारांसाठी आधुनिक बोटी, जाळी, अवजारे, कोल्ड स्टोअरेज यांसारख्या गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँक यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. विशेष म्हणजे, महिला मच्छीमारांसाठी स्वतंत्र योजना आखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावर प्रतिक्रिया देताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी, “मच्छीमारांना जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ते आर्थिक सहाय्य पुरवले जाईल,” असे आश्वासन दिले.
—
📸 फोटो
🏷️ हॅशटॅग्स:
#मच्छीमार #मत्स्यव्यवसाय #नितेशराणे #राज्यसहकारीबँक #शेतकरीहक्क #महिला_मच्छीमार #सहाय्ययोजना #सिंधुदुर्ग

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators