???? सोलापुरात अजित पवार गटाच्या युवक पदाधिकाऱ्याची आत्महत्या; गाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ
सोलापूर :
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोलापूर युवा पदाधिकारी ओंकार हजारे (वय ३२, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री (८ जून) त्यांचा मृतदेह सुपर मार्केटजवळ गाडीत आढळून आल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ओंकार हजारे ‘अण्णा’ या नावाने परिचित होते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर शहर सरचिटणीस पद भूषवत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. रविवारी सकाळपासून ते कोणालाही न सांगता घराबाहेर गेले होते. संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीय व मित्रांनी शोधाशोध सुरू केली.
शोधदरम्यान त्यांची गाडी सुपर मार्केटजवळ आढळली. गाडीत ते सीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यांना तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ओंकार हजारे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. २०१९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे हजारे कुटुंबीयांमध्ये आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
—
???? #सोलापूर #ओंकारहजारे #राष्ट्रवादीकाँग्रेस #अजितपवार #YouthLeader #PoliticalNews #SolapurNews #RatnagiriVartahar
????️ फोटो