११ ते २२ जून दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक मार्ग बदल
खेड-दापोली मार्गावरील कामांमुळे पालगड-सोंडेघर मार्गे वाहतूक वळविण्याचे आदेश
रत्नागिरी (प्रतिनिधी) – खेड-दापोली राज्य मार्ग क्रमांक १६२ वर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दि. ११ जून ते २२ जून २०२५ या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक खेड दस्तुरीमार्गे पालगड-सोंडेघर मार्गे दापोलीकडे वळवण्यात येणार आहे. तसेच दापोलीहून खेडकडे येणारी अवजड वाहनेही या पर्यायी मार्गानेच येतील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
???? फुरुस पुल वाहतूक पूर्णतः बंद – ११ व १२ जूनला सर्व वाहतूक बंद
फुरुस येथे सुरू असलेल्या रीटर्न वॉलच्या कामासाठी आणि पाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी, ११ व १२ जून रोजी खेड-दापोली मार्गावरील फुरुस पुलाजवळ सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी, अपघात किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नागरिकांना माहिती मिळावी आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुनिश्चित व्हावी यासाठी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११६ अंतर्गत वाहतूक चिन्हे उभारण्याचे आदेश पोलीस विभागास देण्यात आले आहेत.
—
???? पर्यायी मार्ग:
➡️ खेड → दस्तुरी → पालगड → सोंडेघर → दापोली
➡️ दापोली → सोंडेघर → पालगड → दस्तुरी → खेड
—
???? हॅशटॅग्स:
#खेडदापोलीमार्ग #वाहतूकवळवली #फुरुसपुल #RatnagiriTrafficUpdate #अवजडवाहतूक #DapoliNews #KhedUpdates #RatnagiriVartahar
—
???? फोटो
—