वसईत लाटांचा तडाखा!किनाऱ्यावरील सुरुच्या बागा उद्ध्वस्त!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वसईत लाटांचा तडाखा!किनाऱ्यावरील सुरुच्या बागा उद्ध्वस्त!

वसई : मागील दोन दिवसांपूर्वी समुद्राला आलेली भरती व वादळी वारे यामुळे वसईच्या भुईगाव व सुरुची समुद्र किनारी शेकडो झाडांची पडझड झाली आहे. सातत्याने बसणाऱ्या लाटांच्या तडाख्यामुळे सुरुच्या बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. वसई पश्चिमेच्या भागात भुईगाव व सुरुची बाग समुद्र किनारा आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने भरलेला असल्याने या भागात मोठ्या संख्येने पर्यटक येतात तर दुसरीकडे विविध प्रजातीचे पक्षी आश्रयाला येत आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात सुरुच्या बागा ही आहेत. या सुरुच्या झाडांमुळे समुद्र किनाऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडत आहे.

मात्र मागील काही वर्षांपासून बेसुमार वाळू उपसा व समुद्राच्या लाटांचा तडाखा यामुळे समुद्र किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप होऊ लागली आहे. याचा फटका सुरुच्या बागांना बसू लागला आहे. मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी समुद्राला मोठी भरती आली होती.त्यामुळे मोठं मोठ्या लाटा ही समुद्र किनाऱ्यावर उसळत होत्या. या लाटांचा तडाखा समुद्रकिनाऱ्यावरील सुरुच्या झाडांना बसला. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो सुरुची झाडे उन्मळून पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरवर्षी वादळी वारे व लाटांच्या तडाख्याने हजारो सुरुची झाडे कोसळतात मात्र त्याला संरक्षण देण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर सुरुच्या बागा नामशेष होतील अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

धूपप्रतिबंधक बंधारा तयार करण्याकडे दुर्लक्ष

दरवर्षी हजारोंच्या संख्येने सुरुची झाडे कोसळून पडत असल्याने किनार पट्टीच्या भागातील सुरुच्या बागाच नष्ट होण्याची शक्यता आहे. धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे. भुईगाव समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे उभारावे यासाठी यापूर्वी १.८० कोटी तर आता आपत्ती व्यवस्थापन नियोजनातून ४.५० कोटी निधीची मंजूर झाला आहे. मात्र बंधाराच तयार न झाल्याने किनाऱ्याची धूप सुरूच असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा