महाराष्ट्राला प्रीती शाह यांच्या लंडन मॅरेथॉनमधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा अभिमान!
मुंबई, – महाराष्ट्राची कन्या, प्रीती अल्पेश शाह यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. टीसीएस लंडन मॅरेथॉनमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मॅरेथॉनमधील सर्वाधिक फिनिशर्सचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या ऐतिहासिक घटनेचा त्या एक भाग होत्या.
२७ एप्रिल २०२५ रोजी लंडन, यूके येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये ५७,४४९ धावपटूंपैकी तब्बल ५६,६४० धावपटूंनी शर्यत पूर्ण करून सर्वाधिक फिनिशर्सचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. या विक्रमी कामगिरीतील प्रीती शाह यांचा सहभाग महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
#प्रीतीशाह #लंडनमॅरेथॉन #गिनीजवर्ल्डरेकॉर्ड #महाराष्ट्रअभिमान #TCSलंडनमॅरेथॉन #भारतीययशस्वी

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.