गुहागरमधील ३५ लाखाच्या विकास कामाला स्थगिती; माजी आमदार डॉ. विनय नातू संतप्त!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? गुहागरमधील ३५ लाखाच्या विकास कामांना स्थगिती; माजी आमदार डॉ. विनय नातू संतप्त!

मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करून अनुशेष भरून काढण्याचा इशारा

गुहागर.(सुजित सुर्वे-वार्ताहर)  गुहागर तालुक्यातील ३५ लाख रुपयांच्या मासेमारी विकास कामाला प्रशासकीय मान्यता असूनही अचानक स्थगिती दिली गेल्यामुळे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करून हा अनुशेष भरून काढण्याचा इशारा दिला आहे.

डॉ. नातू यांनी सांगितले, “गुहागर तालुक्यातील मासेमारी विकासाच्या योजना जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत मंजूर असूनही त्यांना अडथळे आणले जात आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोट्यवधींची कामे चालू असताना गुहागरचे काम थांबवण्यात आले आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.”

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मच्छिमारांची संख्या व मासेमारी उतरवण्याची ठिकाणे पाहता निधीचे योग्य वाटप होणे अपेक्षित आहे.

रत्नागिरी तालुक्यात ३०,००० मच्छिमार व २० मासेमारी ठिकाणे

दापोलीत १४,००० मच्छिमार व ६ ठिकाणे

गुहागरमध्ये १४,००० मच्छिमार व १२ ठिकाणे

राजापूर तालुक्यात १०,००० मच्छिमार

तरीही, जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी रत्नागिरी तालुक्यात ४ कोटी, राजापूरमध्ये सव्वा कोटी, दापोलीत २ कोटी आणि गुहागरला केवळ १ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातही गुहागरमधील ३५ लाखाच्या एका महत्वाच्या कामाला स्थगिती देऊन स्थानिक मच्छिमारांचा हक्क डावलला गेला आहे.

डॉ. नातू म्हणाले, “या अन्यायाविरोधात आम्ही संबंधित मंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन, मत्स्यव्यवसाय विकासाचा अनुशेष भरून काढण्याची मागणी करणार आहोत. सर्व तालुक्यांना समान निधी मिळावा यासाठी माझा प्रयत्न राहील.”

#मत्स्यव्यवसाय #गुहागर #रत्नागिरी #डॉ_विनय_नातू #नीतेश_राणे #कोकणविकास #मासेमारी #DevelopmentWork #रत्नागिरीवार्ता #PoliticalNews #कोकण #रत्नागिरीNews #गुहागरNews #PublicInterest #NewsUpdate

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी