जि.प.शाळा पूर्णगड नं.१ शाळेत छत्रपती राजार्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वेशभूषा ठरली विशेष आकर्षण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प.शाळा पूर्णगड नं.१ शाळेत छत्रपती राजार्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वेशभूषा ठरली विशेष आकर्षण.

रत्नागिरी  तालुक्यातील जि .प .शाळा पूर्णगड नं.१ ता .जि. रत्नागिरी या शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुरुवातीला शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी कु. वेद पावसकर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तद्नंतर विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती कथन केली. मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांजणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला पंचायत समिती रत्नागिरीच्या विशेष शिक्षिका डोर्लेकर मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...