शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली, तालुका गुहागर या संस्थेच्या वतीने जि.प.शाळा सडे जांभारी नं.१ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,आनंद शिवराम जाधव यांचा स्तुत्य उपक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली, तालुका गुहागर या संस्थेच्या वतीने जि.प.शाळा सडे जांभारी नं.१ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आनंद शिवराम जाधव यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली या सामाजिक संस्थेच्या वतीने शिव प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद शिवराम जाधव यांच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील जि. प. सडे जांभारी शाळा नं. १ या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले यामध्ये शालेय दप्तर, पाटी, पेन्सिल, पट्टी, रंगपेटी आणि खाऊ असे साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत तसेच कुडली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झटणारे माझे वडील कालकथीत आदरणीय शिवराम पांडुरंग जाधव त्यांना सावली सारखी साथ देणारी माझी आई कालकथीत आदरणीय प्रभावती शिवराम जाधव यांच्याकडून आंम्हाला लाभलेला विचारांचा, पुण्यकर्माचा, दातृत्वाचा आणि समाजाचे ऋण फेडण्याचा वसा आणि वारसा आंम्ही जोपासण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहोत.विद्यार्थांनी शालेय जीवनात परिश्रम घेऊन आपले जीवन सुखमय करावे.आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करुन आई वडिलांची आणि समाजाची सेवा करावी असे स्पष्ट मत आनंद शिवराम जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करणारी कु.साक्षी आनंद जाधव, कु. आर्या आनंद जाधव यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांनी शालेय शिक्षणा बरोबरच खेळाला देखील महत्त्व दिले पाहिजे. वडिलांनी चालवलेले सामाजिक कार्य आमच्या कडून भविष्यात सुरू राहील असा शब्द दिला. त्यानंतर कु. मयुरी महेंद्र जाधव हिने मनोगत व्यक्त करताना विद्यार्थांनी चांगले शिक्षण घेऊन इंजिनियरच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश घेऊन यशस्वी व्हावे आणि सामाजिक कार्य करत रहावे असे सांगितले
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. स्नेहल शैलेश सुर्वे यांनी शिव प्रभा सामाजिक संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन धन्यवाद दिले. त्यानंतर सडे जांभारी गावचे पोलीस पाटील प्रभाकर सुर्वे, मुख्याध्यापक अमोल होवाळे, सहकारी शिक्षक दिपक राऊत यांनी हि शिव प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते आनंद शिवराम जाधव यांना पुढील सामाजिक चळवळीसाठी शुभेच्छा देऊन आभार मानले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा