साटवली ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभार उघड; एसटी चालक-वाहकांना धोका!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 🚨 साटवली ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभार उघड; एसटी चालक-वाहकांना धोका!

ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करून एसटी सेवा सुरू, पण राहण्याच्या व्यवस्थेचा बोजवारा; साप, मोडकळीस आलेली दरवाजे-खिडक्या अजूनही त्याच अवस्थेत .

जितेंद्र चव्हाण | लांजा प्रतिनिधी

लांजा तालुक्यातील साटवली ग्रामपंचायतीचा गोंधळलेला आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या ७-८ महिन्यांपासून ‘रुण येते वस्ती’ला वळवलेली लांजा एसटी सेवा अखेर ग्रामस्थांच्या मागणीवरून पुन्हा मंगळवारपासून साटवली येथे सुरू करण्यात आली. ही सेवा पूर्वीपासून साटवलीकरांसाठीच चालू होती, परंतु ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेमुळे ती दुसरीकडे वळवण्यात आली होती.

ग्रामपंचायतीनेच लांजा आगार व्यवस्थापक श्रीमती काव्या पेडणेकर यांच्याशी पत्रव्यवहार करून गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी ही गाडी पूर्ववत साटवली गावात आणली.

🛑 पण चालक-वाहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणी घेणार?

पूर्वी वस्ती गाठणाऱ्या एसटी सेवा बंद होण्यामागे वाहक व चालक राहतात त्या ठिकाणच्या धोकादायक परिस्थितीचा मोठा भाग होता –

राहण्याच्या खोलीत दरवाजे-खिडक्या नव्हत्या

बाथरूममध्ये साप घुसण्याच्या घटना

शटर मोडकळीस आलेले

पाण्याच्या जागी गाळ

हीच कारणे पुढे करत गाडी रुण येते वस्तीवर वळवली गेली होती. ग्रामसभा दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नांची जाब विचारल्यावर काही सुधारणा (जसे की खिडक्या लावणे, शटर दुरुस्ती) करण्यात आल्या. मात्र, बाथरूमला अजूनही खिडक्या नाहीत आणि सर्पदोषाचा धोका कायम आहे.

यामुळे वाहनचालक व वाहक अजूनही धोके पत्करून राहतात, आणि त्यावरून हा प्रश्न उपस्थित होतो की – जर जीवितहानी झाली, तर जबाबदार कोण?

📌जनतेची चर्चा ….

ग्रामपंचायतीकडून एसटी सेवा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करून देखावा केला जातो, पण चालक-वाहकांसाठी आवश्यक निवास व सुरक्षिततेबाबत गंभीर दुर्लक्ष केले जाते. ही बाब केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर जाणूनबुजून होणारा अपव्यवस्थेचा नमुना असल्याचे स्पष्ट होते.

🔖 #साटवली #लांजा #STसेवा #ग्रामपंचायत #अनागोदीकारभार #सामाजिकसुरक्षा #रस्तेवाहतूक

📸 फोटो

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा