🏫🎓 म. गांधी विद्यालयाचा ‘माजी विद्यार्थी’ आदर्श: ५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक मदतीचा हात!
#EducationForAll #GivingBack #AlumniSupport #CommunityService #RaniGiriNews #Maharashtra
साखरपा (रत्नागिरी): रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, साखरपा येथील २००७-०८ मधील बारावी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत ५ गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. या उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य, गणवेश, छत्री, चप्पल आणि प्रवेश शुल्क जमा करण्यात आले आहे. या कर्तव्यपर उपक्रमामुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षीही याच बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ५ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले होते. या वर्षी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आठवीचे ३, सातवीचा १ आणि पाचवीतील १ विद्यार्थ्याचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल वाढवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले आहे.
२००७-०८ च्या बारावी विज्ञान बॅचचा निकाल ९८% लागला होता आणि त्यांनी दक्षिण विभागात पहिला क्रमांक पटकावला होता. या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट, नर्स, शिक्षक, कृषी पदवीधर, विविध कंपन्यांचे मॅनेजर, परदेशात एमबीए केलेले उच्च अधिकारी, आयटी क्षेत्रातील उच्च पदाधिकारी, स्वतःची कंपनी असलेले व्यावसायिक, तसेच पोलीस पाटील आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांचा समावेश आहे.
या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “परिस्थितीवर मात करून शिका, खूप मोठे यश संपादन करून आपले आणि आपल्या शाळेचे नाव उज्वल करा. तसेच मोठे झाल्यावर समाजाचे आणि शाळेचे ऋण म्हणून जमेल तेवढे सहकार्य करा.”
या प्रसंगी साई कृपा ट्रॅव्हल्सचे मालक श्री. संतोष चिपळूणकर यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्या-पुस्तके देऊन आपला सहभाग नोंदवला. शाळेतील प्राचार्य बाईंग सर, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचेही यावेळी आभार मानण्या
त आले.