राजापुरात जुनेच जि. प. गट व पं. स. गण कायम; काहींची केवळ नावे बदलली!
प्रारूप प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती सादर करण्याची मुदत
राजापूर / प्रतिनिधी – पुरुषोत्तम खांबल
स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या पुनर्रचनेत राजापूर तालुक्यात पूर्वीचेच, म्हणजेच सहा जिल्हा परिषद गटांसह त्या अंतर्गत १२ पंचायत समिती गण कायम राहणार आहेत. मात्र, जिल्हा परिषदेचे सहाही गट नवीन नावाने ओळखले जातील, तर चार पंचायत समितीचे गण पूर्वीच्याच नावाने राहणार असून आठ गण नवीन नावाने अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना आणि हरकती सादर करण्याची मुदत २१ जुलै २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.
राजापूरमधील पूर्वीची प्रभाग रचना
राजापूर तालुक्यात गेली दोन दशके सहा जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत १२ पंचायत समितीचे गण होते. यामध्ये ओणी, पाचल, केळवली, कोदवली, सागवे, देवाचे गोठणे हे सहा जि. प. गट, तर ओणी, ओझर, पाचल, ताम्हाणे, केळवली, कोंडये तर्फे सौंदळ, सागवे, अणसुरे, देवाचे गोठणे, साखरी नाटे, कोदवली, भालावली असे १२ पंचायत समिती गण अस्तित्वात होते. मध्यंतरी झालेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचनेत तालुक्यात एक जि. प. गट आणि त्या अंतर्गत दोन जि. प. गण वाढून एकूण सात जि. प. गटांसह चौदा पंचायत समिती गण अस्तित्वात आले होते. मात्र, मधल्या काळात अनेक घटना घडल्या आणि अखेर जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे ठरले.
नवीन नावे आणि कायम गण
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे पूर्वीचेच प्रभाग राहणार असले तरी त्यामध्ये ताम्हाणे, केळवली, साखरीनाटे, अणसुरे हे चार पंचायत समितीचे गण जुन्याच नावाने राहणार आहेत. उर्वरित सर्व जि. प. गट आणि आठ पं. स. गण नवीन नावाने ओळखले जाणार आहेत.
नवीन पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट गावे:
१) वडदहसोळ: ओणी, मंदरूळ, चुनाकोळवण, कळसवली, वडवली कोंडीवळे, खरवते, वडदहसोळ, शिवणे बुद्रुक.
२) रायपाटण: ओझर, सौंदळ, कोळवण खडी, येळवण, ओशिवळे, वाटुळ, आडवली, रायपाटण, परटवली.
३) तळवडे: पाचल, कारवली, येरडव, करक, पांगरीखुर्द, झर्ये, तळवडे, परुळे, हरळ.
४) ताम्हाणे: ताम्हाणे, अजिवली, हातदे, मूर कोळंब, काजिर्डा, मिळंद, जवळेथर, तुळसवडे.
५) केळवली: केळवली, मोरोशी, तळगाव, ससाळे, हसोळ तर्फे सौंदळ, मोसम, पांगरी बुद्रुक, दोनीवडे, आंगले, फुफेरे.
६) जुवाटी: कोंडयेतर्फे सौंदळ, प्रिंदावन, जुवाटी डोंगर, विल्ये, महाळुंगे, पन्हळे तर्फे सौंदळ, वालये, शेजवली, हातिवले, कणेरी उन्हाळे.
७) धोपेश्वर: कोदवली, शेढे, कोंढे तर्फे राजापूर, शीळ, चिखलगाव, गोठणे दोनीवडे, धोपेश्वर, गोवळ.
८) पेंडखले: भालावली, भू, तेरवण, कोतापूर खिणगिणी, दसुर, देवीहसोळ, पेंडखले.
९) नाटे: कशेळी, कोंडसर बुद्रुक, राजवाडी, वाडापेठ, मोगरे, नाटे, आंबोळगड.
१०) साखरीनाटे: साखरीनाटे, देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, शिवणेखुर्द, सोलगाव.
११) अणसुरे: अणुसरे, दळे, कुवेशी, पडवे, जैतापूर, मीठगवाणे, माडबन, साखर, निवेली जुवे जैतापूर.
१२) कातळी: सागवे, नाणार, कुंभवडे, तारळ, उपळे.
नवीन जिल्हा परिषद गट:
१) वडदहसोळ
२) तळवडे
३) जुवाटी
४) धोपेश्वर
५) साखरी नाटे
६) कातळी
नवीन पंचायत समिती गण:
* १) वडदहसोळ
* २) रायपाटण
* ३) तळवडे
* ४) ताम्हाणे
* ५) केळवली
* ६) जुवाटी
* ७) धोपेश्वर
* ८) पेंडखले
* ९) नाटे
* १०) साखरीनाटे
* ११) अणसुरे
* १२) कातळी
या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना आणि हरकती नोंदविण्याची मुदत २१ जुलै पर्यंत देण्यात आली असून, तालुक्यातून किती सूचना, हरकती नोंदविल्या जातात, याकडे येथील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
#राजापूर #जिल्हापरिषद #पंचायतसमिती #प्रभागपुनर्रचना #स्थानिकस्वराज्य
संस्था #रत्नागिरी #राजकीयघडामोडी #निवडणूक