सरखेल कान्होजी आंग्रे पुण्यतिथी: वेलदूर नवनगर मराठी शाळेत उत्साहात साजरी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 सरखेल कान्होजी आंग्रे पुण्यतिथी: वेलदूर नवनगर मराठी शाळेत उत्साहात साजरी!

मराठा आरमाराचे शिल्पकार, ‘दर्यासारंग’ कान्होजी आंग्रे यांना वेलदूर येथे आदरांजली.

गुहागर (सुजित सुर्वे ,वार्ताहर) , तालुक्यातील वेलदूर, नवनगर मराठी: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवनगर मराठी येथे मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर होत्या.Ratna

यावेळी गोपाळगड किल्ल्याच्या उभारणीमध्ये कान्होजी आंग्रे यांचा मोठा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला वेलदूर ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा शिक्षण तज्ञ शंकरजी कोळथरकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रवींद्र जांभरकर, सामाजिक कार्यकर्ते तुषारजी पालशेतकर, मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, माजी उपाध्यक्ष सुरक्षाताई रोहीलकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक धन्वंतरी मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या महत्त्वाचे भान ठेवून आरमार उभारले, पण त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकार करण्याचे काम कान्होजी आंग्रे यांनी केले. त्यांच्या पराक्रमाने मराठ्यांचा भगवा झेंडा केवळ सह्याद्रीच्या डोंगररांगांवरच नव्हे, तर हिंदी महासागराच्या लाटांवरही अभिमानाने फडकू लागला.

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरकर यांनी कान्होजी आंग्रे यांचे कार्य विषद करताना सांगितले की, कोकण किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, अंजनवेल येथील गोपाळगड, कुलाबा यांसारखे अभेद्य किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या सहकार्याने उभारले गेले.

मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी कान्होजी आंग्रे यांना ‘मराठा साम्राज्याच्या सागरी शक्तीचा महापर्व’ असे संबोधले. त्यांच्यामुळे इंग्रज, पोर्तुगीज, डच या शत्रूंना शह बसला. शिवाजी महाराजांनी १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांची मराठा नौदलाच्या सरखेल (नौदल प्रमुख) पदावर नेमणूक केली होती. ते आरमाराचे खऱ्या अर्थाने समुद्रातील योद्धा व धारकरी होते असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.

#KanhojiAngre #पुण्यतिथी #VeldoorNavanagar #MarathiSchool #मराठासाम्राज्य #IndianNavyHistory #सरखेलकान्होजीआंग्रे #MaharashtraHistory #NavalHero #समुद्रीयोद्धा #GopalgadFort #शिवाजीमहाराज #Konkan

#आदरांजली

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १६व्या सामन्यात राजस्थान...
Read More
सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

  *शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात* *रत्नागिरी:- निलेश रहाटे जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक...
Read More
शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील...
Read More
गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १४व्या सामन्यात...
Read More
बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा   रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस...
Read More
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): छत्रपती शिवाजी...
Read More
शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६  ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "मराठी...
Read More
मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६