शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरार शाखेकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरार शाखेकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप!

विरार, [संदीप शेमणकर]- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८०% समाजकारण, २०% राजकारण’ या विचारांचा वारसा पुढे नेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विरार (पश्चिम) विराट नगर उपशहर प्रमुख राहुल फडतरे, दीपक चव्हाण, आणि विभागप्रमुख शरद सावंत यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाप्रमुख प्रवीण म्हापरळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती आणि शिवसैनिकांचे योगदान

या कार्यक्रमाला महिला जिल्हा समन्वयक प्राचीताई फणसे, उपतालुका प्रमुख नरेश (काका) वैद्य, शहर प्रमुख विवेक पवार, उपशहर प्रमुख लहू साळुंखे, शहर संघटिका वंदना नांदवीकर, उपशहर संघटिका गीता सिंग, शहर सचिव विनायक नांदवीकर, आणि विभाग प्रमुख आनंद नाईक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभाग संघटिका अनामिका जाधव, उपविभाग प्रमुख राजेश गोळे, भूपेश भायदे, शाखाप्रमुख सुमित गावडे, ललित गायकवाड, शैलेश सक्रे, रोहित शेट्ये, जय खाड्ये, पार्थ भायदे, अस्तित्व या सर्व शिवसैनिकांनी, युवा सेना, आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

 

 

#ShivsenaUBT # नोटबुकवाटप #विरार #समाजकार्य #शिक्षण #युवासेना #महिलाआघाडी #BalasahebThackeray #MarathiNews #CommunityService #EducationF

orAll

Reporters
Author: Reporters

Guhagar Office * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...