कॉ. प्रशांतजी कानडे यांच्या जन्मदिनी कुडली कातळवाडी येथील जि. प. शाळा कुडली नं.२ येथे शैक्षणिक साहित्य वाटप.
(आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
आबलोली (संदेश कदम)….
गुहागर तालुक्यातील कुडली कातळवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं. २ येथे सामाजिक बांधिलकीचे जतन करीत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी कोरोना काळात महामारीच्यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करुन रक्ताच्या बाटल्या संकलित करुन त्याचा अनेक रुग्णांना लाभ मिळवून दिला आहे तसेच मोफत सॅनिटाइजर, मास्क व फळे वाटप करुन समाजसेवा करीत असंघटित कामगारांसाठी अनेक उपक्रम राबवून ते यशस्वी करणारे वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे मुंबई मंडल डिव्हिजनचे सेक्रेटरी आणि ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे वर्किंग कमिटी मेंबर कॉ. प्रशांतजी कानडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने समस्त युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आनंद शिवराम जाधव यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, बॅडमिंटन साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तसेच कुडली गावाच्या विकासासाठी दिवस – रात्र झटणारे व कुडली गावाचा कायापालट करणारे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक , राजकीय व शैक्षणिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव यांच्या १० व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आनंद शिवराम जाधव यांच्या तर्फे दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव वाचनालया तर्फे विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात जि. प. शाळा कुडली नं. २ येथे कॉ. प्रशांतजी कानडे यांच्या वाढदिवसाचा केक कापून करण्यात आली त्यानंतर कुडली येथील प्राख्यात असलेले माजी आमदार श्री. पांडुरंग गोमा थोरसे, आनंद शिवराम जाधव, सौ. शालिनी सावंत, पत्रकार संदेश कदम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल विश्राम थोरसे, वरिष्ठ शिक्षक रविकांत काशिनाथ चौधरी यांचे हस्ते कु. परि प्रदिप देसाई, कु. त्रिशा प्रमोद देसाई,कु.रुद्र राकेश देसाई, कु. रुंजी विजय ठोंबरे, कु. देवांशी सचिन थोरसे, कु. पुर्वा प्रशांत सुर्वे, कु. शर्वरी सचिन देसाई या गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, बॅडमिंटन साहित्य, खाऊ वाटप आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी आनंद शिवराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळा विषयी आणि अभ्यासा विषयी तसेच कॉ. प्रशांतजी कानडे यांच्या सामाजिक कार्याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बध्द सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक रविकांत काशिनाथ चौधरी यांनी केले यावेळी कातळवाडी येथील महिला बहूसंख्येने उपस्थितीत होत्या.