अर्धांगिनी एक पूर्णतःव फाऊंडेशन प्रथम वर्धापन दिनानिमित्त
“सन्मान तिच्या कर्तुत्वाचा” कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई – संदीप शेमणकर
पालघर जिल्ह्यातील सामाजिक संस्था गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी अर्धांगिनी एक पूर्णतःव फाऊंडेशन या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजात काम करणाऱ्या दुर्बल, वंचित, घटकांपर्यंत मदत करणाऱ्या महिलांचा खास सन्मान करण्यात येणार आहे.समाजात आपल्या जाणीव ठेवून निःस्वार्थपणे काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याचा एक अनोखा सोहळा सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी. दुपारी 3.30 ते 6.30 पर्यंत.स्थळ – श्री. छत्रपती शिवाजी मंदिर दादर (प.)मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये
संस्थेची कार्य दिशा आणि उद्दिष्टांची ओळख
” बाई पण भारी देवा” संगीतमय अभिवादन
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान
श्रावण स्पेशल मंगळागौरी स्पर्धा – पारंपारिक आनंदाची उधळण.
तुमच्या कर्तुत्वाला आमचा सन्मान!
“सर्वांचे असावे घर ,सर्वामुखी असावा घास,” “राहू नये कधीच कुणी उपाशी,”
“हा एकाच वसा, हा एकाच ध्यास..!”
जर तुम्ही गेल्या काही वर्षात समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केली असेल, तर तुमचं नाव आणि थोडक्यात परिचय आम्हाला रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी.पर्यंत व्हाट्सअप वर पाठवावा.
संपर्क – 9175775251
7887555251
आपले स्नेहांकित
संस्थापक, अध्यक्षा – सौ.प्रज्ञा प्रफुल पितळे
उपाध्यक्षा – कु. संजना प्रफुल पितळे
“हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे..!”
“आपली उपस्थिती आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा देईल..!”















