खार येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खार येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

आबलोली (संदेश कदम प्रतिनीधी) 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते व विभागप्रमुख ॲड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र.९८ तर्फे तक्षशिला अकादमी,१३/१९ वा रस्ता,खार पश्चिम,मुंबई – ४०० ०५२ येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत, कार्यालयप्रमुख व तक्षशिला अकादमीचे संचालक तुषार शेलार, महिला शाखा संघटिका पल्लवी आरोलकर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एस. आर. ए.चे अध्यक्ष जितेंद्र जाधव, उपशाखाप्रमुख अमित तळपदे, प्रसाद माळी आदी उपस्थित होते.

तुषार शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...