उपकेंद्र नाटे येथे “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत क्ष-किरण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उपकेंद्र नाटे येथे “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत क्ष-किरण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजापूर ~ पुरुषोत्तम खांबल 

“टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत दिनांक 31 जुलै 2025 रोजी नाटे उपकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मोफत क्ष-किरण तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये नाटे, कशेळी, धाऊलवल्ली व राजवाडी कार्यक्षेत्रातील तब्बल 154 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

शिबिरात विशेषतः 60 वर्षांवरील नागरिक, मधुमेह (डायबेटीस) रुग्ण, मागील 5 वर्षांतील क्षयरुग्ण आणि त्यांच्या सहवासातील व्यक्ती यांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. या तपासणीतून संभाव्य क्षयरुग्ण ओळखून त्यांच्यावर वेळेत उपचार सुरु करण्याचे उद्दिष्ट होते.

या शिबिराचे उद्घाटन नाटे सरपंच श्री. संदीप बांदकर , नौशाद धालवेलकर (उप सरपंच, साखरीनाटे) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नाटे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष चव्हाण, सुनील डूगीलकर, सचिन बांद कर, मजीद गोवळकर , मुख्याध्यापक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्हा क्षयरोग केंद्राचे पीपीएम समन्वयक श्री. श्रीकांत सावंत, आरोग्य सहायक श्री. मंगेश पाटील, क्ष किरण तंत्रज्ञ श्री. निलेश हंगे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. राहुल कोकणे, प्रयोगशाळा पर्यवेक्षक श्रीमती आचल मळेकर यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.

या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथून सुपरवायझर श्री. कुंभार यांनी देखील सहभाग घेतला. तसेच नाटे उपकेंद्राचे श्री. मयूर वानखेडे, कशेळी उपकेंद्राचे श्री. कांबळे, वाडा पेठ उपकेंद्राच्या श्रीमती ममता दुधडे, धाऊल वल्ली उपकेंद्राचे श्री. गेजगे, आरोग्य समुदाय अधिकारी श्री. शरद ढवळे, श्री. धनवे, श्री. सोलणकर, आरोग्य सेवक श्रीमती मुलानी, श्रीमती घवाळी, श्रीमती माधुरी वानखेडे, श्रीमती सायली जाधव, वाहनचालक श्री. सुतार, तसेच गटप्रवर्तक व आरोग्य सेविका यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या शिबिराच्या माध्यमातून क्षयरोगाच्या संभाव्य रुग्णांची लवकर ओळख करून त्यांच्यावर त्वरित उपचाराची प्रक्रिया राबवणे, हा प्रमुख उद्देश होता. शासकीय योजनांचा लाभ खेड्यापाड्यांपर्यंत पोहचवणारा हा उपक्रम खरोखरच ‘टीबी मुक्त भारत’ संकल्पनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला