🟠 घरात घुसून शेजाऱ्याच्या कपाटातून सोन्याची चैन चोरीला!
➤ लांजा तालुक्यातील रुण पराडकरवाडीतील घटना; संशयितावर कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल
📍 लांजा प्रतिनिधी | जितेंद्र चव्हाण
रत्नागिरी वार्ताहर
लांजा तालुक्यातील रुण पराडकरवाडी येथे शेजारील तरुणाने घरात चोरून प्रवेश करून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन कपाटातून लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश अंकुश पराडकर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रणय संजय पराडकर (वय २५) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ५ जुलै ते २४ जुलै २०२५ या कालावधीत सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान, त्याच्या घराचे कुलूप चावीने उघडून ऋषिकेश पराडकर याने घरातील कपाटातून सुमारे ५ ग्रॅम वजनाची व अंदाजे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरली.
तक्रारीनुसार, लांजा पोलीस ठाण्यात ऋषिकेश पराडकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर करीत आहेत.
🔍 हा प्रकार एकाच वाडीत राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण करणारा असून स्थानिकांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा आहे.
🔖 #लांजा #चोरीचीघटना #रत्नागिरी #पोलीसगुन्हा #रुणपराडकरवाडी #सोन्याचीचैन #BreakingNews