वाटद MIDC विरोधात कोकणातून संतापाचा भडका – अस्तित्वाच्या लढ्यासाठी मुंबईत रणशिंग

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाटद MIDC विरोधात कोकणातून संतापाचा भडका – अस्तित्वाच्या लढ्यासाठी मुंबईत रणशिंग

मुंबई प्रतिनिधी | निलेश रहाटे

रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, कोळीसरे आदी निसर्गसमृद्ध गावांवर प्रस्तावित MIDC प्रकल्पाचे संकट अधिकच गडद झाले आहे. या प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या हालचालींना स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, या विरोधाची धग आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे.

या गावांतील शेतकरी, जमिनीचे मूळ मालक आणि सामान्य ग्रामस्थांनी आता हा लढा केवळ जमिनीचा नसून, गाव, संस्कृती आणि अस्तित्वाच्या रक्षणाचा लढा असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्पविरोधात एकत्र आलेल्या स्थानिकांनी निर्णायक भूमिका घेत मुंबईमध्ये या लढ्याची रणनिती आखण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी दादर येथील पर्ल सेंटर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीला संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गोपाळ गावणकर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, नंदकिशोर आग्रे, ओमकार शितप यांच्यासह मुंबईस्थित असणारे ग्रामस्थ कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आला की, “जोपर्यंत ही अधिसूचना शासन रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.” असे सर्वानुमते ठरविण्यात आले. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करताना, येत्या आठ दिवसांत दादर येथे हजारोंच्या संख्येने निदर्शने करण्यात येणार असून, सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि मानवाधिकार विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनसंवाद सभा घेतली जाणार आहे.

तसेच, संघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ लवकरच मा. उद्धव ठाकरे आणि मा. राज ठाकरे यांची भेट घेऊन स्थानिक भावना आणि मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. प्रशासनाने आणि शासनाने जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर समितीने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली की,

“विकास हवा, पण आमच्या अटींवर. आमच्या जमिनी बळकावून नव्हे, तर शेतीपूरक किंवा पर्यटनावर आधारित प्रकल्प आणल्यास आम्ही सहकार्य करू, पण जबरदस्तीचा विकास नको.”

*संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी सांगितले की,*

वाटद MIDC प्रकल्पाविरोधातील हा संघर्ष केवळ स्थानिक नसून संपूर्ण कोकणच्या भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील काही दिवसांत या आंदोलनाला वेग आणि व्यापक स्वरूप प्राप्त होणार हे नकीच.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound