जैतापूर-देवगड सागरी महामार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, 7 महिला गंभीर जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जैतापूर-देवगड सागरी महामार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, 7 महिला गंभीर जखमी

राजापूरजवळ टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात; 1 महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

अपघातानंतर परिसरात हळहळ; जखमी महिलांवर रत्नागिरी सिव्हिलमध्ये उपचार सुरू.

✍️ राजू सागवेकर | राजापूर

राजापूर तालुक्यातील जैतापूर–देवगड सागरी महामार्गावरील चिरेखाण स्टॉपच्या पुढे आज (बुधवार) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात महिला गंभीर जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण गावातून बागकामासाठी निघालेल्या महिला अरविंद तिवरामकर यांच्या मालकीच्या टेम्पोने प्रवास करत होत्या. चालक संतोष नाचणेकर हा जानशी पठाराच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना वाहनावरील ताबा सुटला. परिणामी, टेम्पो सुमारे 100 ते 150 फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला.

 

अपघातात टेम्पोतील महिला प्रवासी, एक लहान मुलगी, तसेच चालक आणि केबिनमधील पुरुष प्रवासी जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले. त्यानंतर अधिक उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच एका महिलेचा मृत्यू झाला.

 

अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक 15–20 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. तेथे तुटलेले सामान, फुटलेल्या काचा आणि रक्ताचे डाग या अपघाताच्या भीषणतेची साक्ष देत होते. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, जखमी महिलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईक रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण पंचक्रोशी आणि वाघ्रण गावावर शोककळा पसरली आहे.


हॅशटॅग:

#राजापूर #जैतापूर,#सागरीमहामार्ग ,#रत्नागिरी ,#अपघात,भीषणअपघात,#वाघ्रण,#टेम्पोअपघात#दुःखद

* #Rajapur #Jaitapur * #RoadAccident#Ratnagiri* #MaharashtraNews#TragicAccident * #RoadSafety

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...