केंद्रशाळा मळण नं. १ येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न – देणगीदारांकडून उत्स्फूर्त सहकार्य

मळण :- भारतीय स्वातंत्र्यदिन व हर घर तिरंगा अभियान निमित्ताने आयोजित केलेले विविध उपक्रम येथील केंद्रशाळा मळण नं. १ या शाळेत विद्यार्थ्यांच्या, गावाच्या व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून उत्स्फूर्तपणे साजरे करण्यात आले. दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन, कवायत संचलन, बालसभा, ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती व मिरवणूक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच देणगीदार यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी देणगीदारांनी शाळेसाठी रोख व वस्तुरूपात देणग्यादिल्या तसेच विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली.
यावेळी इयत्ता १ ली ते ७ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना श्री. प्रतिश आंबेकर व परिवार यांनी ७०००/-, श्री. सुनील उर्फ नाना साळवी यांनी ५०००/- श्री. श्रीकांत काशिनाथ ओक यांच्याकडून रुपये ३०००/- रोख रकमेची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. प्रतिश आंबेकर यांनी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व ८० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगज व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी पार्श्व प्रदीप शिगवण याला आदर्श विद्यार्थी म्हणून तसेच मळण गावातून इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या मनाली संदीप धामणस्कर यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. राजुशेठ वहाळकर यांनी ५ किलो व श्री. सुरेश उर्फ दादा वहाळकर यांनी ३ किलो जिलेबी दिली. तसेच श्री. संतोष गणपत साळवी व श्री. संतोष शिगवण यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला. तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा सोलकर यांनी रोख रुपये २००२/- विद्यार्थ्यांसाठी बक्षीस दिले. शाळेच्या लाईट बिलांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून निधी उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायत मळणचे सरपंच नारायण गुरव व यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. गावातील नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.जोराचा पाऊस असताना सुद्धा ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या देशभक्तीचे प्रदर्शन करीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावातील शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ यापुढेही असेच कार्यरत राहू, अशा भावना कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने या कार्यक्रमाची अत्यंत भावपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.















