शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभे तर्फे “आरती संग्रह” पुस्तकाचे प्रकाशन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभे तर्फे “आरती संग्रह” पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई – संदीप शेमणकर
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबई विभाग क्र.८ विभाग प्रमुख सुरेशजी पाटील तसेच ग्राहक संरक्षण कक्ष सचिव निखिलजी सावंत व अशोकजी शेंडे या सर्वांचा हस्ते आरती संग्रह पुस्तक याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर यांच्या प्रयत्नातून आरती संग्रह पुस्तक छापण्यात आले असून या उपक्रमचे सर्वांनी कौतुक केले.यावेळी यशवंत खोपकर ,कक्ष कार्यालय चिटणीस विश्वनाथ जाधव,कक्ष प्रसारक अनंत पवार, उपसंघटक राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड १२३ संघटक संतोष चादे,कक्ष वार्ड संघटक १२४ निर्मला आवटे,
कक्ष वार्ड संघटक १२६ तानाजी उलालकर,इत्यादी पदाधिकारी आरती संग्रह प्रकाशन कार्यक्रमला उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...