मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजित श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ संपन्न..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजित श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ संपन्न..!

आबलोली (संदेश कदम) ….

रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ नुकताच ‘ जिद्द ‘ सहकारी गृहनिर्माण संस्था ,पागझरी रोड, चिपळूण येथे संपन्न झाला. गेली 28 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण आणि एड्स आदी क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या अधिपत्याखाली तर बुद्धपुजा पाठ संस्कार आयु. सुनील शिवगण गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

यावेळी विचारपीठावर मुख्य व्याख्याते, धम्म मार्गदर्शक ,धम्म उपासिका आदरणीय विशाखाताई गमरे (प्राथमिक शिक्षिका, बामणोली ,चिपळूण) यांच्या समवेत जनजागृती सेवाभावी संस्था, चिपळूण संस्थाध्यक्ष डॉ.संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते सन्मा. काशिराम कदम गुरुजी उपस्थित होते .या श्रावण पौर्णिमा वर्षावासाचे औचित्य साधून धम्म उपसिका, आदरणीय विशाखाताई गमरे यांनी ‘ बौद्ध धम्मातील आदर्श महिलांचे कार्य, कर्तृत्व आणि फुले ,शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील महिलांची सद्यःस्थिती’ या विषयांतर्गत उपस्थित उपासक, उपासिकाना संबोधित करताना सद्यःस्थितीत भारतालाच काय? अखिल विश्वाला बौद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही. बुद्धकालीन मातृसत्ताक असलेल्या या भारतवर्षात प्रत्येक स्त्री सुरक्षित होती.तिला सन्मानाने , आदराने जगण्याचा अधिकार होता . परंतु आजच्या घडीला दोन-चार वर्षाच्या बालिकापासून ते साठ वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीवर होणारे लैंगिक अत्याचार हे कशाचे द्योतक आहे? यावर चीड व्यक्त करून त्यांनी बुद्धकालीन भिक्षुणी सुजाता, भिक्षुणी पट्टाचारा , भिक्षुणी आम्रपाली, अशा अनेक भिक्षुणींच्या कार्य, कर्तृत्वाची, विशेषत: आदर्शाची उदाहरणे देऊन उपस्थितांना बुद्धकालीन ते आजच्या सद्यःस्थितीतचे विचार मंथन करण्यास भाग पाडले.

त सेच बौद्ध धम्मातील प्रत्येक उपासकाने अंगीकारलेले धम्माचे आचरण हाच खरा त्यांच्या जीवन मुल्याचा निकष आहे. यावर विस्तृत विचार व्यक्त करताना डॉ. संजय सावंत यांनी धम्म आणि आरोग्य, धम्म आणि संविधान व संविधान आणि रोजगार याविषयी त्यांनी वेगवेगळ्या अंगांनी सहज सुलभरित्या यावर भाष्य केले. तर सन्मा. काशीराम कदम गुरुजींनी मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने जे जे उपक्रम राबवले जात आहे हेच खरे सत्कर्माचे प्रतिक म्हणावे लागेल. बुद्ध धम्मातील ‘सत्कर्म’ या विषयी भगवान बुद्धानी केलेले भाष्य जे चांगले काम केले जाते ते सत्कर्म. जे दान पारमितामध्ये कोणत्याही दानाच्या माध्यमातून केलेले दानाचे कार्य ते सत्कर्म आणि आजच्या वर्षावासाच्या अनुषंगाने धम्मातील उपासक, उपासिकांना धम्मविचारपीठ उपलब्ध करून धम्मातील मानवी जीवन मुल्यांवर सुसंवाद साधण्याकरिता आयोजित केलेला हा धम्मसंस्कार म्हणजे या मौलिक सत्कर्माचा एक मी भाग म्हणेन असे प्रतिपादन केले. तसेच मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी संस्कार समारंभाची सांगता करताना म्हणाले , धम्माला ऊर्जितावस्था प्राप्त करण्याकरिता सद्यःस्थितीत प्रत्येक पालकांसमवेत घरातील बालकांच्याही तनामनामध्ये बुद्ध, धम्म, संघाची संज्ञा आणि प्रज्ञा, शील , करुणेची ‘ धम्मपदा’ रुजवली गेली पाहिजे. देशातल्या प्रत्येक प्रज्ञावंत नागरिकांनी जर बुद्धांचे ‘ पंचशील ‘ अंगीकारले तर अन्याय, अत्याचार, बलात्कार, हिंसाचार, हत्याकांडाच्या भीषण उद्रेकाच्या विषारीवृत्तीला निश्चितच आळा बसेल. असा ठाम विश्वास व्यक्त करून समाजातील प्रत्येक समाजघटकांनी संविधान साक्षर होणे आज काळाची गरज आहे असे म्हणाले. या अनुषंगाने कायद्याचा अभ्यास करणारी धम्मउपासिका कु. सेजल संजय सावंत हिचा प्रोत्साहनपरत्वे सन्मान करण्यात आला.    याप्रसंगी निवृत्ती आरोग्य अधिकारी अनंत हळदे , विद्युत महामंडळाचे निवृत्त अधिकारी अशोक जाधव, संजय पवार, मिलिंद सावंत , चिपळूण एसटीतील आगारातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहिते, सुदाम सावंत, अजित कुरणे आदी समवेत महिला उपासिका बहुसंख्य उपस्थित होत्या.सौ. राजक्रांती कदम-तांबे (मिरजोळी, चिपळूण) यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विस्तृतपणे धम्मातील, समाजातील आणि विविध कार्यक्षेत्रातील आदर्श, नामवंत महिलांच्या कार्य ,कर्तृत्वाचे दाखले देऊन आपल्या सूत्रसंचालनानी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सदर संस्कार समारंभ यशस्वी करण्याकरिता सौ.राजमुद्रा कदम, कु. संघमित्रा कदम, कु. संघराज कदम आणि सामाजिक कार्यकर्ते सन्मा. सुरेश जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन