मंडणगड न्यायालयाच्या नूतन इमारतीची पालकमंत्री उदय सामंत यांचेकडून पाहणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🟣 मंडणगड न्यायालयाच्या नूतन इमारतीची पालकमंत्री उदय सामंत यांचेकडून पाहणी

 

१० सप्टेंबरपर्यंत हस्तांतरणाचे आदेश; लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते

मंडणगड – मंडणगड येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तसेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची नव्याने उभी राहिलेली भव्य व देखणी इमारत पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदय सामंत यांनी पाहणी करून आढावा बैठक घेतली.

यावेळी पालकमंत्री सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत ही इमारत पूर्णपणे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. या नूतन इमारतीचे लोकार्पण तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हा ऐतिहासिक सोहळा मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

या बैठकीस जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, विविध प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

🔖 हॅशटॅग्स

 

#Mandangad #Ratnagiri #CourtBuilding #UdaySamant #Judiciary #MaharashtraNews

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...