मित्र पक्षांनी सन्मानाची वागणूक न दिल्यास जि.प.व पं. स.निवडणुका स्वबळावर लढण्याचा रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा निर्धार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मित्र पक्षांनी सन्मानाची वागणूक न दिल्यास जि.प.व पं. स.निवडणुका स्वबळावर लढण्याचा रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा निर्धार

आबलोली (संदेश कदम)

नियोजन मंडळ, शासकीय समित्या किंवा शासकीय कमिट्या यावर रिपब्लिकन (आठवले) या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावले जात आहे. शासकीय निधीबाबतही तीच अवस्था आहे. यापुढे असे घडत राहिले आणि महायुतीच्या मित्रपक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक न दिल्यास आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपालिका,नगरपरिषद यांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असा ठाम निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला

गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाची गुहागर तालुक्याची बैठक तालुकाध्यक्ष संदीप कदम ( रानवी ) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी नियोजन मंडळ, शासकीय कमिट्या किंवा शासकीय समित्या यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावडले जात आहे. तरी महायुतीच्या मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना यापुढे सन्मानाची वागणूक न दिल्यास स्वबळावर लढण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला. यावेळी या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)या राजकीय पक्षाचा शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांतीभूमी महाड येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला पुरुष कार्यकर्ते आणि सभासदांचे तसेच गाड्यांचे नियोजन करण्यात आले त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची सभासद मोहीम आक्रमकपणे वाढवण्याच्या दृष्टीने विभागात, गावा – गावात, वाडी – वाडीत बैठका घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे ठरले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम (आबलोली ), तालुकाध्यक्ष संदीप कदम (रानवी)यांनी जिल्ह्याच्या बैठकीत झालेली चर्चा सभागृहात सांगितली यावर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेऊन एकमुखी निर्धार करण्यात आला

या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप कदम (रानवी), जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम (आबलोली), युवकचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष विजय असगोलकर (असगोली), तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव (वेळंब), सरचिटणीस सुनील गमरे(जामसूत), सरचिटणीस चंद्रकांत मोहिते (पवार साखरी), सरचिटणीस दशरथ पवार(असगोली), कोषाध्यक्ष दीपक गमरे(पालपेणे), प्रवक्ते शशिकांत जाधव (वरवेली), तालुका संघटक भीमसेन सावंत(गुहागर), शंकर मोहिते (कोतळूक), सचिन मोहिते (पवार साखरी), आयटी सेलचे तालुकाध्यक्ष संदेश कदम (आबलोली) आदी. कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन सरचिटणीस सुनील गमरे यांनी केले व शेवटी सर्वांचे आभार मानले

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला