गुहागर भाजपातर्फे शनिवारी 20 सप्टेंबर रोजी शृंगारतळी जानवळे येथे जाखडी नाच महोत्सवाचे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर भाजपातर्फे शनिवारी 20 सप्टेंबर रोजी शृंगारतळी जानवळे येथे जाखडी नाच महोत्सवाचे आयोजन रोजी

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवस दिनी स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुक्याच्यावतीने शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शृंगारतळी नजीक जानवळे येथील भवानी सभागृहात सायंकाळी 5 पासून पारंपारिक जाखडी नाच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणची लोककला, जुन्या धार्मिक, सांस्कृतिक रुढी परंपरा टिकण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. भजन, शक्ती तुरा नाच, नमन स्पर्धा, महोत्सव अनेक ठिकाणी होतात मात्र जुनी परंपरा असलेली पारंपारिक जाखडी नाच स्पर्धा किंवा महोत्सव गुहागर तालुक्यात झाला नव्हता जुनी पारंपारिक लोककला असलेली जाखडी ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोकणातील प्रत्येक गावात, वाडीमध्ये गणपती सणामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. जुनी लोककला परंपरा ही टिकली पाहिजे या उद्देशाने पारंपारिक जाखडीला व्यासपीठ मिळावे, वेगवेगळ्या पद्धतीने नाचाचे प्रकार, जुनी महाभारत, रामायण कथेवरील गाणे आधुनिक तंत्रज्ञान युगात नवीन पिढीला समजली पाहिजे यासाठी या पारंपारिक जाखडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जुनी लोककला परंपरा असलेल्या आगळ्यावेगळ्या जाखडी महोत्सवाचे आयोजन प्रथमच गुहागर तालुक्यात होत आहे.
या पारंपारिक जाखडी महोत्सवात गुहागर तालुक्यातील 10 नाच मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक मंडळाने 20 मिनिटांमध्ये आपली लोककला सादरीकरण करायची आहे. तरी या पारंपारिक जाखडी महोत्सवात गुहागर तालुक्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, तालुकावासियांनी या महोत्सवात उपस्थित राहून सहकार्य करावे या महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन गुहागर तालुका भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी सचिन मुकुंद ओक मो. 9421187497, संतोष सांगळे मो.नं. 9405056079, प्रथमेश पाडेकर मो.नं. 8888130251 यांच्याजवळ संपर्क साधण्याचे आवाहन भाजपा गुहागर तालुका वतीने करण्यात आले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला