वाहत्या गटारावर टाकलेले दगड माती काढणार केव्हा
मुंबई प्रविणभाऊ पवार
खार पुर्व, जवाहर नगर, भवानी बॅक परिसरातील HE विभाग महामहानगर पालिका वाॅर्ड क्र ९४ च्या हद्दीतील हुसेन टेकडी मार्ग सांताक्रूझ व वांद्रे दिशेला जाणार मार्ग संत ज्ञानेश्वर मार्ग (पाईप लाईन रोड) च्या शिवालिक वेंचर बिल्डिंगच्या गेट समोरील एप्रिल महिन्यापासून गटार दुरुस्ती च्या नावाखाली खोदकाम करुन ठेवलेले काम अर्धवट अवस्थेत आहे.
खोदकाम केलेले कामाच्या खाली खार पुर्व जवाहर नगर वस्तीतील मुख्य गटार लाईन आहे. हि गटार लाईन खार रेल्वे स्थानक ते लाल मैदान, वाघावाडी, धोबीघाट, शिवशंभू, ओमभारत, साईबाबा रोड करत सर्व पाण्याचा प्रवाह या गटारातून मिठा नदीला जाऊन मिळत आहे. सद्या हे अर्धवट करुन ठेवले आहे. या अर्धवट कामामुळे सर्व मातीचा ढिगारा गटाराच्या प्रवाहात साचून ठेवला आहे. या पावसाळ्यामुळे पाण्याचा प्रवाह व्यवस्थित झाला नाही. त्यामुळे विभागातील नागरिकांच्या घरादारात पाणी पाणी साचलेले होते. सद्या हे कॉन्ट्रॅक्टरनी अर्धवट सोडून पळाला आहे.
त्याचबरोबर गटाराच्या अवतीभवती कचरा, गोण्याचा ढिगारा, पडिक मोटारसायकल, MTNL चा पडलेला बॉक्स यांनी हा सर्व परिसर व्यापून गेला आहे. गटारी लाईन दिसण्यात येत नाही. या अडचणी व समस्याकडे स्थानिक लोक प्रतिनिधी व महानगरपालिका अधिकारी लक्ष देत का नाही. तेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने त्वरित आपलं लक्ष देऊन या गटाला तील गाळ व मातीचा ढिगारा साफ करून तो पूर्वापार व्यवस्थित करुन द्यावा अशी आपणास नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येते आहे.















