Highlights today .गुहागर मध्ये ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Highlights today .गुहागर मध्ये ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा

आबलोली (संदेश कदम)

कुणबी ओबीसींच्या आरक्षणात पुढारलेल्या मराठा जातीची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष होणारी घुसखोरी थांबविणेबाबत. तसेच इतर ओबीसींच्या मागण्या संदर्भात ओबीसी संघर्ष समन्वय समिती, गुहागरच्या वतीने
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना गुहागर तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देणे अगोदर गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय गुहागर पर्यंत हजारोंच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला.

  ▶️ . गुहागर OBC मोर्चा VDO पहा 👆

या मोर्चामध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागरचे अध्यक्ष पांडुरंग पाते, सरचिटणीस निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम निवाते,गौरव वेल्हाळ, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका गुहागर सरचिटणीस प्रदीप बेंडल, दीपक कनगुटकर, भंडारी समाज तालुकाध्यक्ष नवनीत ठाकूर, तेली समाज तालुकाध्यक्ष प्रकाश झगडे, माजी सभापती विलास वाघे, मंगेश मते,अजित बेलवलकर, प्रदीप सुर्वे, सुजाता बागकर, प्रांजल कचरेकर, पूजा कारेकर, संजय पवार, प्रथमेश पाडेकर, धनश्री मांजरेकर, मानसी शेटे, अपूर्वा बारगोडे, अनंत पागडे, श्रावणी पागडे, ॲड. प्रमेय आर्यमाने,उमेश खैर,संगम मोरे, निलेश मोरे, बबलू आग्रे, मंगेश रांगले,अनिल घाणेकर,वैभव आदवडे, महादेव वणे, समीर डिंगणकर, लक्ष्मणशेठ शिगवण,संजय आग्रे, विजय पागडे यांच्यासह ओबीसीतील सर्व समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,
दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी हैद्राबाद गॅजेटीअर मधील नोंदी विचारात घेवून मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीबाबत जो शासन निर्णय केला आहे, तो ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे. हा निर्णय मूळ कुणबी जातीवर आणि ओबीसींवर अन्याय करणारा आहे, त्याबद्दल राज्यसरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो.

महाराष्ट्रातील कुणबी-ओबीसी (भटके-विमुक्त, बलुतेदार, अलुतेदार, विशेष मागासवर्गासहित) वेळोवेळी मराठा जात्तीच्या ओबीसीमधील घुसखोरीला ठाम विरोध करीत आलेले आहेत. दि.५ में २०२१ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे पुढारलेला मराठा समाज ओबीसी अर्थात कुणबी जातीमध्ये घुसखोरी करून ओबीसींचे तुटपुंजे २७ टक्के आरणक्षणही हिसकावून घेत आहे. राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे. शासनाच्या या पक्षपाती वागणुकीमुळे महाराष्ट्रातील तमाम कुणबी ओबीसींमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत. या जातींमध्ये विशेषतः कोकणामध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. त्यामुळे एका व्यक्तीच्या दोन जाती असणे हे घटनाबाहय व नियमबाहय आहे. तरीही सरकार मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घेवून मूळच्या कुणबी जातीवर घोर अन्याय करीत आहे. अनेक मागण्या गेल्या प्रत्येक वर्षापासून प्रलंबित आहेत तसेच ओबीसींचे अनेक शैक्षणिक नोकरी विषयक व स्वयंरोजगार विषयक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत याकडे राज्य सरकार दुर्दैवाने दुर्लक्ष करत आहे या मागण्यांवर राज्य शासनाने येत्या पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास संघटनेच्या वतीने अखंड कोकणामध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही ओबीसी बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनात एकूण १५ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

फोटो
ओबीसी संघर्ष समन्वय समिती व कुणबी समाजोन्नती संघ गुहागर यांच्या वतीने गुहागरचे निवासी नायब तहसीलदार विद्याधर वेशपायन यांना निवेदन देण्यात आले.
छाया – संदेश कदम, आबलोली

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला