समाजसेवक यशवंत खोपकर आदर्श लोकसेवा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड-२०२५ ने सन्मानित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजसेवक यशवंत खोपकर आदर्श लोकसेवा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड-२०२५ ने सन्मानित

मुबंई – संदीप शेमणकर
सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्ह्याच्या माध्यमातून पंचरत्न मित्र मंडळ व आदर्श मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना “इंडियन एक्सलन्स अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.तर विक्रोळी येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक,मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर यांना आदर्श लोकसेवा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड-२०२५ ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा. सुधीर सावंत माजी खासदार (निवृत्त ब्रिगेडीअर), मान रविंद्र मालुसरे अध्यक्ष मुंबई मराठी वृत्तपत्र संघ, प्रसिद्ध कोळी गीत गायक संतोष चौधरी (दादूस), संतोष शिकतोडे प्रसिद्ध समाज सेवक तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मान.सागर नटराज, अशोक भोईर, संपादक संजय भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.प्रती वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते विकास हायस्कूल सभागृह, विक्रोळी पूर्व येथे आदर्श लोकसेवा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड-२०२५ रविवारी १४ सप्टेंबर ला देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार साठी संस्थेनेसामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता,साहित्य,वैद्यकीय,क्रीडा आदींचा समावेश केला आहे.सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांनाआदर्श लोक सेवा तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दिला.गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव संदीप चादीवडे दौलत बेल्हेकर , वसंत घडशी, गंधाली मयेकर, राजेंद्र पेडणेकर, संतोष चादे, सुनील पिंपळे, विश्वास तेली, राजेंद्र चिखलकर, संतोष होलब, यांच्या सहकार्यने यशवंत खोपकर सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका