कोरम नसल्याचा बहाणा; कोट्यवधी बक्षीसही राहिले अपूर्ण”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोरम नसल्याचा बहाणा; कोट्यवधी बक्षीसही राहिले अपूर्ण”

रत्नागिरी (प्रतिनिधी – निलेश रहाटे)

संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घेण्यात येणारी बंधनकारक ग्रामसभा सरपंच व ग्रामसेवकाने जाणूनबुजून तहकूब केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१७ सप्टेंबर रोजी नियोजित विशेष ग्रामसभेला ३५ ते ४० ग्रामस्थ उपस्थित असूनही ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक रमेश डडमळ यांनी ‘कोरम पुर्ण नाही’ असे सांगत सभा तहकूब केली. ग्रामस्थांचा आरोप आहे की, “इतरत्र ग्रामपंचायतींमध्ये अशाच परिस्थितीत सभा घेण्यात आली; मात्र फुणगुस ग्रामपंचायतीत वेळ बदलून ११ वाजता सभा ठेवली गेली आणि उशिरा आलेल्या ग्रामस्थांचा बहाणा करून सभा न घेणे हा शासन आदेशाचा उघड अवमान आहे.” एकीकडे सरकार या ग्रामसभांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत असून, योग्य काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांच्या प्रोत्साहनपर बक्षिसांची संधी उपलब्ध करून देते. मात्र दुसरीकडे संबंधित सरकारी अधिकारीच अशा ग्रामसभा घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने शासनाच्या उपक्रमावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

याआधी २५ ऑगस्ट रोजीची ग्रामसभा देखील ‘कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७(३) नुसार तहकूब ग्रामसभा सात दिवसांच्या आत घेणे बंधनकारक असतानाही आजवर सभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते सुभाष लांजेकर जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, व सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा देत सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. विनोदकुमार शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थ व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात सरपंच अशोक पांचाळ यांच्यावर पदच्युतीची कारवाई आणि ग्रामसेवक रमेश डडमळ यांच्यावर अनुशासनात्मक चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे. “योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी निलेश रहाटे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला